धान्य वाटपात पारदर्शकता हवी

im-74437.jpg
im-74437.jpg
Updated on


सगरोळी, (ता.बिलोली, जि. नांदेड) ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाउन असल्याने गरीब कामगारांची उपासमार होऊ नये यासाठी शासनाने तीन महिन्यांचे राशन एकाच वेळी वाटप करण्याचे ठरविले आहे. या धान्य वाटपात पारदर्शकता ठेवण्यात यावी या बाबत अटकळी (ता. बिलोली) गावचे सरपंच तथा महाराष्ट्र सरपंच परिषदेचे बिलोली तालुकाध्यक्ष अॅड. रामदास शेरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री, नांदेडचे पालकमंत्री, खासदार, आमदार, जिल्हाधिकारी, पुरवठा अधिकारी व बिलोलीचे तहसीलदार यांच्याकडे पत्राद्वारे विनंती केली आहे.

शासनाकडून नियमित राशन
प्रत्येक गावात गोरगरिबांसाठी स्वस्त धान्य दुकानात शासनाकडून नियमित राशन मिळते. दुकानदार धान्य वाटप करून मशीनवर अंगठा घेतात व मशीनमधून आलेली पावती देणे अपेक्षित असते. परंतु, अर्धवट धान्य देऊन हाताने लिहिलेली पावती दिली जाते, तर अनेक वेळा नुसता अंगठा घेऊन या वेळेस शासनाकडूनच धान्य मिळाले नाही, आल्यानंतर मिळेल, असे उत्तर दिले जाते. त्यामुळे भूमिहीन, शेतमजूर व गरिबांच्या हक्काचे असलेले हे धान्य गरजू व हक्कदारांच्या पोटात न जाता स्वस्त धान्य दुकानदार व पुरवठा अधिकारांच्या घशात जात असल्याची सर्वत्र परिस्थिती आहे. शिक्षित किंवा दादागिरी करणाऱ्या नागरिकांना राशन मिळते. परंतु, अशिक्षित व अडाणी असलेल्या भोळ्याभाबड्या नागरिकांना हाकलून दिले जाते व गरीब लोक धान्यापासून वंचित राहतात. यापूर्वी हाताला काम असल्याने चार पैसे मिळवून गरिबांची चूल पेटत होती. परंतु, कोरोनाच्या संकटामुळे सर्वत्र लॉकडाउन झाल्याने मागील दहा दिवसांपासून हाताला काम नसल्याने गरिबांजवळील पुंजी संपली असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

तीन महिन्यांचे राशन एकाच वेळी
या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन शासनाने अशा संकटात गरिबांच्या पाठीशी राहण्यासाठी तीन महिन्यांचे राशन एकाच वेळी देण्याची घोषणा केली असून अतिशय चांगला निर्णय घेतला आहे. परंतु, स्वस्त धान्य दुकानदारांना लागलेली चोरीची सवय या वेळीही ते दाखवतीलच ही भीती आहे. काही बोटावर मोजण्या इतपत स्वस्त धान्य दुकान वगळता अटकळीसह संपूर्ण बिलोली तालुक्यात सारखीच परिस्थिती आहे. लाभार्थींच्या नावे स्वस्त धान्य दुकानात आलेले संपूर्ण धान्य हे पारदर्शक पद्धतीने लाभार्थींना वाटप व्हावे यासाठी प्रशासनाने योग्य पद्धतीने नियोजन करावे, असे शेरे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. 


गावात तितली या खेळामुळे एकाच ठिकाणी ४० ते ५० लोक एकत्र येत असून त्यामुळे कोरोनाचा प्रसार होऊ शकतो. तसेच आदमपूर फाटा येथे राजरोसपणे दारूची विक्री होत असल्याने व्यक्तींचा संपर्क वाढला आहे. याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, नागरिकांनी घरीच राहावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.