भोकरदन : जिल्हा जालना तालुक्यातील प्रल्हादपुर गावात ग्रामपंचायत पोटनिवडणुक घोषित झाली होती यापोटनिवडणुकीसाठी प्रभांग क्रमांक 3 मधुन विलास गायकवाड व अक्षय गायकवाड अनुसूचित जात या प्रवर्गातून दोन बांधवांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते मात्र गावकर्यांनी निवडणुकीवर बहिष्कार व नेत्यांना गावबंदी असा निर्णय या आधीच गावकऱ्यांनी घेतला.
या निर्णयाला पाठिंबा म्हणुन आणि मराठा आरक्षण आंदोलनाला समर्थन म्हणुन दोन्ही अनुसूचित जातीप्रवर्गातील बांधवांंनी आपले उमेदवारी अर्ज ता.२५बुधवारी मागे घेऊन आम्ही गावकर्यांसोबत असल्याचा निर्धार केला.
यावेळी गावकरी व तालुक्यातील मराठासेवकांच्या वतीने तहसील कार्यालय येथे दोन्ही उमेदवारांचा सत्कार करून त्यांचे आभार मानण्यात आले इतर समाजबांधवही मराठा आरक्षणप्रश्नी समाजासोबत असल्याचे या बांधवांनी दाखवुन दिले असुन त्यांच्या या आदर्शवत निर्णयासाठी त्यांचे सकल मराठा समाज व ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले प्रल्हादपुर गाव हे ग्रामपंचायत निवडणुकीवर प्रत्यक्ष थेट बहिष्कार टाकणारे प्रथम गाव ठरले असुन गावकर्यांनी घेतलेल्या या निर्णायाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.