आजोबांची रक्षा विसर्जनासाठी गेलेल्या नातवाचा पाण्यात बुडून मृत्यू

सुचित पाठक हे मुंबई येथील भारत पेट्रोलियमच्या कार्यालयात सेवेत होते.
Parbhani News
Parbhani Newsesakal
Updated on

वालूर (जि.परभणी) : आजोबांची रक्षा सावडण्याच्या कार्यक्रमानंतर रक्षा विसर्जन करण्यासाठी गेलेल्या गेलेल्या ३३ वर्षीय नातवाचा गोदावरी नदी पात्रातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (ता.आठ) सकाळी घडली. या घटनेमुळे वालूर गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. वालूर (ता.सेलू) येथील भिकूदेव नागूदेव पाठक (वय ९३ ) यांचे वृद्धापकाळाने सोमवारी (ता.७) पहाटे तीनच्या सुमारास निधन झाले. त्यांच्यावर सोमवारी सकाळी वालूर-बोरी रस्त्यावर वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार (Parbhani) करण्यात आले. मंगळवारी (ता.आठ) सकाळी त्यांचा रक्षा सावडण्याचा कार्यक्रम आटोपून रक्षा विसर्जन करण्यासाठी नातू सुचित मारोती पाठक (वय ३३ ) हा इतर नातेवाईकासोबत रामपुरी (ता.सेलू) गावाजवळील गोदावरी नदीच्या (Godavari River) घाटावर गेले होते. (Grandson Drawned During Final Rituals On Grand Father In Parbhani)

Parbhani News
कोरोना काळात कुणी काय केलं, चंद्रकांत पाटलांचा महाविकास आघाडीला सवाल

रक्षा विसर्जन करताना सुचित पाठक यास नदीपात्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात डाॅ.संकेत आल्डे यांनी उत्तरीय तपासणी केली. सुचित पाठक हे मुंबई (Mumbai) येथील भारत पेट्रोलियमच्या (Bharat Petroleum) कार्यालयात सेवेत होते. त्यांच्या पश्चात आजी, वडील, पत्नी, एक तीन वर्षांची मुलगी, एक भाऊ असा परिवार आहे. सुचित पाठकच्या मृत्यूमुळे वालूर गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.