Green Chilli Price Today : जळकोटमध्ये हिरव्या मिरचीच्या दरवाढीचा ठसका; आठवडे बाजारात दर १२० ते १३० किलोवर

मागील महिन्याभरात लसणाचे भाव चांगलेच वधारले होते.चारशे रुपायापर्यत गेलेला लसून आजमियीत ८० ते १०० रुपयांवर आलेला असतानाच हिरव्या मिरचीच्या दराचा चांगलाच ठसका झाला आहे.
Green Chilli
Green Chilli esakal
Updated on

जळकोट : मागील महिन्याभरात लसणाचे भाव चांगलेच वधारले होते.चारशे रुपायापर्यत गेलेला लसून आजमियीत ८० ते १०० रुपयांवर आलेला असतानाच हिरव्या मिरचीच्या दराचा चांगलाच ठसका झाला आहे.

आठवडे बाजारात दर १२० ते १३० किलोवर गेल्याने उन्हाच्या तडाख्यातही हिरव्या मिरचीच्या दर वाढीचा ठसका जाणवत आहे. इतर पालेभाज्यांच्या तुलनेत मिरचीला समाधानकारक दर मिळत असल्याने योग्य दाम मिळत असल्याने शेतकरी वर्ग सुखावला आहे.

बाजारात आवक कमी असल्याने मिरचीच्या दरात वाढ झाली आहे.आवक कमी झाली असली तरी मागणी वाढत आहेत.लग्नसराई व सणासुदीच्या काळात हिरव्या मिरचीला मागणी वाढते. रोजच्या जेवणात फोडणीसाठी व चवीला तिखटपणा येण्यासाठी रोज शहरी व ग्रामीण भागात मिरची सर्रासपणे वापरली जाते.

त्यात उन्हळ्यात हिरव्या पालेभाज्या रुचकर लागण्यासाठी सामान्य मिरची व काळ्या पाठीची मिरची तिखट झाली असून गृहणींनींच्या किचन बजेटमध्ये वाढ झाली आहे.मात्र उन्हाळ्यात इतर भाज्यांच्या तुलनेत फक्त मिरचीचे दर वाढले असून इतर भाज्यांचे दर आवाक्यात आहेत.

मागील वर्षी सुरुवातीला टोमॅटोची लाली वाढली नंतर त्या पाठोपाठ डिंसेबरमध्ये लसणाच्या दराचा तडाखा,आता हिरवी मिरचीचा भाव वाढीचा झटका दिल्यामुळे सामन्य जनतेला खिशाला झळ बसली आहे. तरी अनेकवेळा बाजारपठेत रस्त्यावर भाजीपाला फेकून देणाऱ्या शेतकप्यांना मात्र कष्टाचे दाम मिळत असल्याने त्यांच्या चेहप्यावर समाधान आहे.

वाढत्या तापमानामुळे फुलगळ

मिरचीला समाधारकारक दर मिळत असला तरी वाढती उष्णता, बदलते हवामान ,पाणी टंचाईमुळे फळ धारणाना अवस्थेत फुलांची गळ होत आहे. त्यासाठी महागडी औषध फवारणी व पाणी देण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. फुळगळीने मिरचीच्या उत्पादनावर परिणाम होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.