पालकमंत्र्यांची मदत अन् गरिबांच्या पेटल्या चुली

barad.jpg
barad.jpg
Updated on


बारड, (ता.मुदखेड, जि. नांदेड) ः बारड (ता. मुदखेड) जिल्हा परिषद सर्कलअंतर्गत गावात शासनाच्या याेजनांपासून वंचित असणाऱ्या गाेरगरीब, गरजू कुटुंबीयांना पालकमंत्री अशाेक चव्हाण यांच्या वतीने प्रशासन यंत्रणेच्या नियाेजनाखाली जीवनावश्‍यक वस्तूंचे वाटप करण्यात आले असून उपासमारीच्या विळख्यातील कुटुंबीयांच्या चुली पेटल्याने पाेटाच्या खळगीचा प्रश्‍न तूर्त सुटल्याने आधार मिळाला आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी शासनाचा लाॅकडाऊन तसेच साेशल डिस्टन्सिंगचा काटेकाेरपणे पालन करण्याचा निर्धार केला असून, घरात बसा, काेराेना पळवाचा संदेश यानिमित्ताने दिला आहे.

घरपाेच वाटप

केंद्र शासन तसेच राज्य शासन यांनी काेराेनासारख्या महामारी राेगावर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिकांसाठी लाॅकडाऊन तसेच साेशल डिस्टन्सिंग लागू केला आहे. राज्यातील जनतेने काेराेनाला हरविण्याचा निर्धार केला असून सामुदायिक लढा उभारला आहे. परंतु, काेराेनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू असल्याने पाेटावर हात असणाऱ्या गरीब मजूरवर्गासमाेर कुटुंबीयांचा उदरनिर्वाह कसा चालवावा, असा माेठा प्रश्‍न पडला आहे. शेतात राेजमजुरीवर काम करणाऱ्या सालगड्यांना शिधापत्रिका नाही. तसेच शासनाच्या याेजनांचा लाभ मिळत नाही. पालकमंत्री अशाेक चव्हाण यांनी मुदखेड तालुक्यातील प्रत्येक गावात तलाठी, ग्रामसेवक यांच्याकडून सर्वे करून यांची यादी घेतला आहे. बारड व मुगट जिल्हा परिषद सर्कलअंतर्गत गरजू, गाेरगरीब एक हजार तीनशे कुटुंबीयांना जीवनावश्‍यक वस्तूंचे किट तयार करून घरपाेच वाटप करण्याची माेहीम राबविली आहे.

डाळ असलेली अन्नधान्याची किट

काेराेना लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री अशाेक चव्हाण यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषद याेजनेंतर्गत गावात शासनाच्या याेजनांचा लाभ मिळत नसलेल्या गाेरगरीब, गरजू कुटुंबीयांना अन्नधान्याची किट उपलब्ध करून देण्यात आली आहे. बारड, पांढरवाडी, शंबाेली, नागेली, वैजापूर पार्डी, निवघा, तिरकसवाडी, डाेंगरगाव, राेहिपिंपळगाव, मुदखेड यासह आदी गावांतील गरजू कुटुंबीयांना स्थानिक प्रशासनाच्या नियंत्रणाखाली जीवनावश्‍यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत गाेरगरीब कुटुंबीयांना तांदूळ, गहू, साखर, गाेडतेल, चहापत्ती, हळद, चटणी, डाळ असलेली अन्नधान्याची किट आहे.

काेराेना पळवाचा संदेश
पालकमंत्री अशाेक चव्हाण यांच्या संकल्पनेतील अन्नधान्याची किट वाटपसाठी ग्रामविस्तार अधिकारी अनुप श्रीवास्तव, मंडळ अधिकारी पी. बी. लाठकर, तलाठी अंजली बार्शीकर यांनी नियाेजन केले. साेशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी तसेच गर्दी टाळण्यासाठी सहायक पाेलिस निरीक्षक नितीन खंडागळे यांनी नियमावली आराखडा तयार केला हाेता. काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष गाेविंदराव शिंदे नागेलीकर, काँग्रेस समिती तालुकाध्यक्ष उद्धवराव पवार निवघेकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी काेराेना लाॅकडाऊन तसेच शासनाच्या साेशल डिस्टन्सिंग काटेकाेरपणे पालन करण्याचा निर्धार केला आहे. या वेळी पंचायत समिती सभापती बालाजी सूर्यतळे, उपसभापती आनंदराव गादिलवाड, काँग्रेस जिल्हा सल्लागार उत्तमराव लाेमटे, वीरशैव शाखाप्रमुख श्रीराम कोरे, डाॅ. चंद्रप्रकाश शिंदे, सेवा सहकारी साेसायटी अध्यक्ष बालासाहेब देशमुख, माजी उपसरपंच गाेपाळ देशमुख, माध्यम समूहाचे प्रतिनिधी नामदेव बिच्चेवार, बसदीप पानबुडे, किशाेर बिलेवाड यांच्यासह अनेकांची उपस्थिती हाेती. ग्रामस्थांना घरी बसा, काेराेना पळवाचा संदेश या वेळी काँग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.