Gymnastics: जिम्नॅस्टिकमधील उगवता तारा; अभिषेक शिंदेनं राष्ट्रीय पातळीवर छाप पाडत घातली सुवर्णपदकाला गवसणी

A Rising Star in Gymnastics: इयत्ता सहावीत असतांनाच अभिषेक जिन्मॅस्टीककडे वळला. वेदिका जिम्नॅस्टिक क्लबमध्ये सराव करणारा अभिषेक अभ्यासतही हुशार होता.
gymnastics
gymnastics Sakal
Updated on

परभणी : संतुलन, ताकद, लवचिकता, चपळता, समन्वय, कलात्मकता व सहशक्तीचा संगम म्हणजे जिम्नॅस्टिक. शारीरिक व्यायामाच्या या खेळ प्रकारात येथील अभिषेक परमेश्वर शिंदे याने राष्ट्रीय पातळीवर आपली छाप पाडली असून सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.

येथील ओयासिस इंग्लीश स्कुलमधून नुकताच दहावीच्या परीक्षेत ९४ टक्के गुणासह उत्तीर्ण झालेल्या अभिषेकला वडील ॲड. परमेश्वर शिंदे व मनिषा यांचे भक्कम पाठबळ लाभल्यामुळे शिक्षणासह त्याने जिम्नॅस्टीकमध्ये देखील मोठी मजल मारली आहे.

इयत्ता सहावीत असतांनाच अभिषेक जिन्मॅस्टीककडे वळला. वेदिका जिम्नॅस्टिक क्लबमध्ये सराव करणारा अभिषेक अभ्यासतही हुशार होता. अभ्यासाबरोबरत तो कधी वेदिकामध्ये तर कधी जिल्हा क्रीडा संकुलात प्रशिक्षक संदीप उत्तमराव लटपटे यांच्या मार्गदर्शनाखाली जिम्नॅस्टीकचे धडे गिरवू लागला.

राष्ट्रीय स्पर्धेत चमकला

एकीकडे सराव सुरु असताना अभिषेकने अनेक स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला. शालेय राज्यस्तरीय जिन्मॅस्टिक स्पर्धेत सलग तीन वेळेस त्याने छत्रपती संभाजीनगर विभागाचे प्रतिनिधित्व केले. ही बाब देखील परभणीसारख्या कुठल्याही सुविधा नसलेल्या शहरासाठी निश्चितच भूषणावह आहे.

अभिषेक याने एप्रिल २०२२ मध्ये अमरावती येथे झालेल्या राज्य संघटनेच्या राज्य अजिंक्यपद जिन्मॅस्टिक स्पर्धेत जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करताना टंबलिंग या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक पटकावले. वर्ष २०२३-२४ मध्ये झालेल्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत ट्रॅम्पोलीन व टंबलींग या प्रकारात कास्यपदक पटकावले व त्याची निवड राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात झाली.

केरळ येथील कोझीकोडी येथे फेब्रुवारी २०२४ मध्य़े झालेल्या या स्पर्धेत अभिषेकने महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून दिले. एकीकडे दहावीचा अभ्यास तर दुसरीकडे राज्य, राष्ट्रीय स्पर्धेची तयारी, याचा समन्वय साधत अभिषेक याने सुवर्णपदकाला गवसणी घातली.

सध्या अभिषेक पुणे येथे इन्फीनीटी या जिम्नॅस्टीक क्लबमध्ये सराव करीत असून त्याच बरोबर जेईईचे क्लास देखील करीत आहे. भविष्यात त्याचा देशाला जिन्मॅस्टिकचे पदक मिळवून देण्याचा मानस आहे. त्यादृष्टीने अभिषेकची तयारी सुरु झाली आहे. परभणीसारख्या शहरात जिन्मॅस्टिकसाठी फारशा सुविधा नाहीत.

जिल्हा क्रीडा संकुलात जिल्हा जिम्नॅस्टिक संघटनेचे उत्तमराव लटपटे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे चिंरजीव राष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक संदीप लटपटे व प्रदीप लटपटे शहरातील बाल खेळाडूंचा सराव घेतात. त्यातूनच अनेक राज्य, राष्ट्रीय खेळाडू घडले आहेत.

अभिषेक हा देखील एक शिस्तप्रिय खेळाडू आहे. आव्हाने स्विकारण्याची व त्याला सामोरे जाईन यश मिळवण्याची जिद्द त्यामध्ये कायम असते. येणाऱ्या काळात अभिषेक निश्चितच देशाला पदकाची प्राप्ती करुन देईल, असा विश्वास त्याचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक संदीप लटपटे यांनी व्यक्त केला आहे.

अभिषेक याने अभ्यास व खेळ याचा चांगला समतोल राखत मोठे यश मिळवले आहे. प्राचार्य महेंद्र मोताफळे हे देखील त्याला अभ्यासात वेळोवेळी मार्गदर्शक करतात. त्यामुळे दहावीच्या परीक्षेसह राष्ट्रीय जिन्मॅस्टीक स्पर्धेत त्याने पटकावले सुवर्णपदक जिल्ह्यासाठी भूषणावह आहे.

— सुशील जोरगेकर क्रीडाशिक्षक, ओयासिस इंग्लीश स्कूल, परभणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com