जाफराबाद - शालेय विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनी शालेय गणवेश वाटप न केल्याने स्वराज्य संघटना व प्रहार जनशक्ती पक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (ता. २०) अर्ध नग्न आंदोलन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्वराज्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष विकास जाधव यांच्यासह सुनील पंडित, शरद पंडित, तानाजी पंडित,सागर खेकाळे, लहू सिरसाठ, शिवम जाधव, अंश परिहार, नारायण सोन्नी, सिद्वेश्वर वर्गने, एकनाथ, शिंदे, अरुण जंजाळ, उबेद पठाण दिलीप देवडे, अमोल पवार, मनोहर जंजाळ सिताराम पंडित, भागवत पंडित, रुपेश पंडित, संदीप म्हात्रे यांनी आंदोलनात सहभाग घेतला.