फुलंब्री : फुलंब्री विधानसभेचे विद्यमान आमदार हरिभाऊ बागडे तब्बल 40 वर्षे राजकारणात सक्रिय राहून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता, आमदार, कॅबिनेट मंत्री, विधानसभा अध्यक्ष आणि आता थेट राजस्थानच्या राज्यपाल पदी बागडे यांचे नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्ता पक्षाशी एकनिष्ठ राहिल्यानंतर थेट राज्यपाल होऊ शकतो हे भाजपने दाखवून दिले आहे.
फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील चित्तेपिंपळगाव येथे सर्वसामान्य कुटुंबात 17 ऑगस्ट 1944 रोजी जन्मलेले हरिभाऊ बागडे यांनी राजकारणाची सुरुवात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून केली.
सुरुवातीला हरिभाऊ बागडे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून मतदार संघात संघटन उभारले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघामधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात 1985 मध्ये पहिल्यांदा आमदारकी लढविली आणि त्यात ते विजयी झाले.
त्यानंतर तब्बल चार वेळेस हरिभाऊ बागडे आमदार म्हणून निवडून आले. सन 1995 - 1999 या काळात युतीचे सरकार असताना मनोहर जोशी मुख्यमंत्री होते. याच सरकारमध्ये हरिभाऊ बागडे यांची अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड करण्यात आली.
1999 ते 2000 या कालावधीत फुलंब्री तालुक्याची निर्मिती करण्यात आमदार हरिभाऊ बागडे यांनी सिंहाचा वाटा उचलला. तत्कालीन मंत्री गोपीनाथराव मुंडे यांच्या माध्यमातून फुलंब्री गावाला तालुक्याचा दर्जा मिळवून दिला.
फुलंब्री तालुका झाल्यानंतर सर्वच शासकीय कार्यालयाची सुरुवात फुलंब्री सुरू करण्यात आली. सन 2003 व 2009 या दोन विधानसभा निवडणुकीत हरिभाऊ बागडे यांना काँग्रेसचे डॉ. कल्याण काळे यांच्याकडून पराभव पत्करावा लागला.
2014 मध्ये मोदी लाटेत आमदार हरिभाऊ बागडे हे पुन्हा फुलंब्री विधानसभा मतदारसंघावर भाजपकडून निवडून आले. 2014 मध्ये केंद्र व राज्यात सत्तांतर झाल्याने फडणवीस सरकारच्या काळात हरिभाऊ बागडे यांची थेट विधानसभा अध्यक्षपदी वर्णी लागली.
विधानसभेचे सर्वोच्च पद हरिभाऊ बागडे यांनी पाच वर्ष सांभाळले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत डॉ.कल्याण काळे यांचा पराभव करीत हरिभाऊ बागडे यांनी मतदारसंघात वर्चस्व प्राप्त केले. आतापर्यंत फुलंब्री विधानसभा मतदारसंघात भाजपचे वर्चस्व राहिले आहे.
पडतीच्या काळातही बागडे भाजप पक्षाशी एकनिष्ठ राहिल्याने हरिभाऊ बागडे यांची भाजपने थेट राजस्थानच्या राज्यपाल पदी निवड केली आहे. 1985 ते 2024 या तब्बल 40 वर्षाच्या काळात बागडे राजकारणात सक्रिय राहिले. त्यामुळे एक सामान्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता ते राज्यपाल असा प्रवास आमदार बागडे यांचा राहिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.