तो देत होता पिकांना पाणी पण...

श्रीराम भगत
श्रीराम भगत
Updated on

भूम (जि. उस्मानाबाद) : मध्यरात्री शेतात पिकांना पाणी देत असताना सर्पदंश झाल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. भूम तालुक्‍यातील नवलगाव येथे ही घटना घडली. गेल्या अनेक महिन्यांपासून शेतीसाठी रात्रीच्या वेळी वीजपुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांना कडाक्‍याच्या थंडीत पिकांना पाणी देताना दररोज मृत्यूशी झुंजावे लागत असल्याच्या शब्दात शेतकरी रोष व्यक्‍त करीत आहेत. 

नवलगाव शिवारातील घटना 
श्रीराम अंबऋषी भगत (वय 46, रा. नवलगाव, ता. भूम) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. मंगळवारी (ता. 24) रात्री ते नवलगाव शिवारातील शेतात ज्वारीच्या पिकास पाणी देण्यासाठी गेले होते. रात्री बाराच्या सुमारास त्यांना उजव्या पायाच्या अंगठ्यास काहीतरी टोचल्याचा भास झाला. त्यानंतरही पाणी देण्याचे काम त्यांनी सुरूच ठेवले. काही वेळानंतर अस्वस्थ वाटू लागल्याने ते घराकडे परतले.

घरी आल्यानंतर त्यांनी पायाला काहीतरी टोचल्याचे सांगितले असता कुटुंबीयांनी पाहिले असता त्यांना उजव्या पायाच्या अंगठ्यास दोन ठिकाणी साप चावल्याचा संशय आला. कुटुंबीयांनी त्यांना तत्काळ उपचारासाठी भूम येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. या वेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सर्पदंश झाला असल्याचे सांगितले. त्यांना पुढील उपचारासाठी तत्काळ बार्शी येथे नेण्यात आले. मात्र जगदाळे मामा हॉस्पिटल येथे उपचारासाठी हलविण्यात आले असता डॉक्‍टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. त्यांच्यामागे वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. 

शेतीपंपासाठी रात्रीच केला जातो वीजपुरवठा 
अनियमित पावसामुळे पारंपरिक पद्धतीने शेती करणे जिकरीचे झाले आहे. त्यात शेतीपंपासाठी सुरळीत वीजपुरवठा होत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. परतीच्या पावसामुळे यंदा रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी हरभरा, गहू, ज्वारीची पिके घेतली आहेत. जमिनीतील ओलाव्यामुळे पिकेही जोमात आली आहेत. सद्य:स्थितीत शेतशिवार हिरवळीने बहरले आहे. मात्र भरघोस उत्त्पन्न मिळण्यासाठी पिकांनी पाणी देणे आवश्‍यक आहे; परंतु विजपंपांसाठी गेल्या काही वर्षांपासून रात्री विज पुरवठा केला जात असल्याने शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. कडाक्‍याच्या थंडीत शेतात रात्रभर राबराब राबून शेतकऱ्यांना पिकांना पाणी द्यावे लागत आहे. रात्रीच्या वेळी सर्पदंश, तसेच अनुचित प्रकार घडण्याची शक्‍यता असल्याने शेतकरी शेतीसाठी दिवसा विज पुरवठा करण्याची मागणी करीत आहेत; मात्र या मागणीची अद्याप दखल घेण्यात आली नाही. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.