हिंगोली : दूषित जलस्रोतामुळे ६०० लोकवस्ती असलेल्या गावात मूत्रपिंडाचे रुग्ण ४०

गावातील विहीर आणि कूपनलिकेच्या पाण्यामुळे मूत्रपिंडांची कार्यक्षमता कमी होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले
health news due to contaminated water 40 kidney patients in sengaon village hingoli
health news due to contaminated water 40 kidney patients in sengaon village hingolisakal
Updated on

सेनगाव : बामणी खुर्द (ता. सेनगाव) हे ७०-७५ उंबऱ्यांचे गाव. पण, गावातील जलस्रोत दूषित आहेत. त्यामुळे सद्यःस्थितीत तब्बल ४० ग्रामस्थ मूत्रपिंडाच्या विकाराने त्रस्त आहेत. मूत्रपिंड निकामी होऊन गावातील २० जणांचा मृत्यू आतापर्यंत झाला आहे. गावात पाणी शुद्धीकरण करण्याची यंत्रणा बसविण्यात आलेली नाही. परिणामी, दरवर्षी मूत्रपिंड विकाराचे किमान चार ते पाच नवे रुग्ण आढळून येत आहेत. सोनसावंगी आणि बामणी खुर्द या दोन्ही गावांची गट ग्रामपंचायत आहे. ग्रामपंचायतीने सोनसावंगी येथे पाणी शुद्धीकरण करण्याची यंत्रणा बसविली. पण, बामणी खुर्दकडे दुर्लक्ष झाले. या गावात भेट दिली असता शेषाबाई जाधव म्हणाल्या, ‘‘गावातील प्रत्येक घरात जलजन्य आजाराने त्रस्त असलेली एक तरी सदस्य आहे.

सध्या गॅस्ट्रोची साथ पसरली आहे. जुलाब, उलटी यामुळे संपूर्ण गाव त्रस्त झाले. मूत्रपिंड विकाराचे रुग्णही वाढत आहेत. गावात दरवर्षी चार ते पाच जणांच्या मूत्रपिंडांवर पाण्याचा परिणाम होत आहे.’’ गावातील विहीर आणि कूपनलिकेच्या पाण्यामुळे मूत्रपिंडांची कार्यक्षमता कमी होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. गावामध्ये ग्रामपंचायतीची पाणीपुरवठा योजना नाही. परिणामी, कूपनलिका आणि गावातील विहिरींच्या पाण्यावरच गावकऱ्यांची तहान भागवली जात आहे. सध्या ४० रुग्ण मूत्रपिंडांच्या आजाराने त्रस्त आहेत.

गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. प्रशासनाने अद्याप कुठलीही सोय केलेली नाही. परिसरातील कूपनलिकेचे पाणी पिण्यासाठी आणावे लागत आहे. या पाण्यामुळे मूत्रपिंडाचा आजार होत आहे. गावात २० जणांचा या आजाराने मृत्यू झाला आहे.

- विजय जाधव, ग्रामस्थ, बामणी खुर्द

बामणी खुर्द या गावात आरोग्य कार्यालयाकडून दोन वर्षांपूर्वी पाण्याच्या चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये सिलिका रसायन आढळून आले. या बाबत आम्ही संबंधित ग्रामपंचायतीला शुद्धीकरण यंत्रणा उभारण्यास सांगितले होते.

- डॉ. सतीश रुणवाल, तालुका आरोग्य अधिकारी, सेनगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.