परभणी : मागील चार दिवसांपासून सुरु असलेल्या अतिवृष्टीने Heavy Rain बुधवारी (ता.१४) पालम Palam तालुक्यातील प्रमुख गळाटी व लेंडीसह सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून त्यांना पूर आला आहे. परिणामी, १२ गावांचा संपर्क पालम शहराशी तुटला आहे. गंगाखेड Gangakhed-लोहा Loha राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पहाटेपासून ठप्पा झाली आहे. तालुक्यात शनिवारपासून (ता.दहा) सातत्याने अतिवृष्टी होत आहे. त्यातच मंगळवारी (ता.१३) रात्रीपासून पालम तालुक्यात Parbhani मुसळधार पाऊस सुरु झाला. बुधवारी (ता.१४) सकाळी दहापर्यंत पाऊस चालूच होता. त्यामुळे तालुक्यात पाणीच- पाणी झाले आहे. सर्व नद्या, ओढे, नाल्यांना पूर आला आहे. गोदावरी नदीची Govdavari River प्रमुख उपनदी असलेली गळाटी व लेंडी नदीला आज पहाटेपासून पूर आला आहे. दोन्ही नद्यांचे पाणी नदीपात्र सोडून जवळपास दोन हेक्टर क्षेत्रावरून वाहत असल्याचे दिसत आहे. heavy rain hit palam tahsil of parbhani, all rivers overflow glp88
त्याखाली जवळपास ३० ते ३५ गावांतील हजारो हेक्टर क्षेत्राखालील पिके पाण्याखाली गेली आहेत. गळाटीच्या पुरामुळे सायळा, उमरथडी, खुरलेवाडी, धनेवाडी, तर लेंडी नदीच्या पुरामुळे पुयनी, आडगाव, तेलजपुर, आरखेड, सोमेश्वर, घोडा, फळा, फरकंडा आदी गावांचा संपर्क पालम शहराशी संपर्क तुटला आहे. शिवाय, तालुक्यातील जवळा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला पाण्याने वेढा दिला आहे. पुयनी गावातही पाणी शिरले असून आडगाव येथे दोघांची घरे पडल्याने नुकसान झाले आहे.
राष्ट्रीय महामार्गही बंद
राष्ट्रीय महामार्गाची वाहतूक बुधवारी पहाटेपासून ठप्प आहे. केरवाडीजवळील पुलावरून गळाटी नदीचे पाणी वाहत आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाची वाहतूक बंद झाली आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी हजारो वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. प्रवासी पहाटेपासून अडकल्याने त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. आणखीही पाऊस सुरूच असल्याने वाहतूक सुरळीत होण्यास किती वेळ लागेल, हे सांगता येत नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.