Marathwada Monsoon : लातूर, धाराशिवला जोरदार पाऊस

मराठवाड्याच्या बहुतांश भागात रविवारी (ता. ९) मॉन्सूनचे आगमन झाले. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड जिल्ह्यांत काल जोरदार पाऊस झाला.
Marathwada Monsoon
Marathwada Monsoonsakal
Updated on

लातूर/धाराशिव : मराठवाड्याच्या बहुतांश भागात रविवारी (ता. ९) मॉन्सूनचे आगमन झाले. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड जिल्ह्यांत काल जोरदार पाऊस झाला. संभाजीनगर शहरात सोमवारी दिवसभर उघडीप होती. मात्र, रात्री अकराच्या सुमारास सरी बरसल्या. लातूर-धाराशिवमध्ये विजांच्या कडकडाटासह धारा बरसल्या.

लातूर शहरात रात्री सातच्या सुमारास मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला. दीड ते दोन तास झालेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचले होते. चाकूर, निलंगा, कासार सिरसी, निटूर, लातूर रोड, शिरोळ-वांजरवाडा, नळेगाव, रोहिणा आदी भागांत पाऊस झाला.

धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुका आणि परिसरात दुपारी मुसळधार पाऊस झाला. कोरेगाव-माडज रस्ता पाण्याखाली गेला होता. औराद, गुंजोटीवाडी, पळसगाव, कदेर, मुरळी भागात पावसाने दमदार हजेरी लावली. दुपारी साडेतीनच्या सुमारास सुरू झालेला पाऊस अडीच तास कोसळत होता. खामसवाडीतही अर्धा तास जोरदार पाऊस झाला. पावसामुळे नदी, नाले, ओढ्यांना पाणी आले होते.

मराठवाड्यात वादळी पावसाचा अंदाज

छत्रपती संभाजीनगर ः मराठवाड्यात येत्या तीन ते चार दिवसांत वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने छत्रपती संभाजीनगर, नांदेड, जालना, लातूर, बीड जिल्ह्यांचा समावेश आहे. तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट असणार आहे. वाऱ्याचा ४० ते ५० किलोमीटर प्रतिताशी वेग असेल, अशी माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागातर्फे कळविण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.