Marathwada: मराठवाड्यात जोरदार पाऊस, पाचोडचा पुल गेला वाहून; सहा तास वाहतूक विस्कळीत

Latest Pachod News: गल्हाटी नदीवरील पूल वाहून गेल्याने सहा तास वाहतुकसेवा विस्कळीत झाली.
Marathwada: मराठवाड्यात जोरदार पाऊस, पाचोडचा पुल गेला वाहून; सहा तास वाहतूक विस्कळीत
Updated on

Latest Rain Update: गेल्या दीड महिन्यापासून दडी मारलेल्या वरुणराजाने मघा नक्षत्राच्या प्रारंभी मंगळवारी (ता.२०) रात्री आठ वाजेच्या सुमारास पाचोड (ता.पैठण) परिसरात विजेच्या कडकडाट व वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावल्याने प्रथमच पावसाळ्यात नदीनाल्यांना पुर येऊन पाचोड खुर्द (ता.पैठण) येथील गल्हाटी नदीवरील पूल वाहून गेल्याने सहा तास वाहतुकसेवा विस्कळीत झाली.

पावसाळा सुरू होऊन अडीच महिन्याचा कालावधी उलटला असला तरी पैठण तालुक्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने सर्वत्र तलाव, विहीरी, नदीनाले, अन्य जलसाठे कोरडेठाक राहीलीत. भर पावसाळ्यात तालुक्यातील ७६ गावांना ९१ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तालुक्यात आतापावेतो रिमझिम शिवाय मोठा पाऊस न झाल्याने पिके जोमदार बहरून पाणीटंचाई कायमच राहिली.

Marathwada: मराठवाड्यात जोरदार पाऊस, पाचोडचा पुल गेला वाहून; सहा तास वाहतूक विस्कळीत
Marathwada Rain: मराठवाड्यात पावसामुळे ३३ जणांचा मृत्यू, ४७२ पशुधनही दगावले

परंतु दिड महिन्याच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर रात्री पाऊण तास झालेल्या जोरदार पावसामुळे सर्व नदीनाल्यांना पुर धरणीमाता तृप्त झाली. शेवटची घटका मोजणाऱ्या पिकांना जिवदान मिळाले असले तरी वादळी वाऱ्याने फुलोऱ्यात आलेली बाजरीचे पिक व सांगणीला आलेले मुगाच्या पिकाचे नुकसान झाले. बाजरी, कापूस, मका, सोयाबीन, तुरीचे पिकं आडवी झाली. मात्र तालुक्यातील लघु व मध्यम प्रकल्प , पाझर तलाव भरण्यासोबतच विहीरींना पाझर फुटण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतिक्षा लागून आहे. तरी बागायतदार शेतकरी अजुन ही मोठ्या पावसाच्या प्रतिक्षेत आहेत.

Marathwada: मराठवाड्यात जोरदार पाऊस, पाचोडचा पुल गेला वाहून; सहा तास वाहतूक विस्कळीत
Marathwada: वाळूमाफियांसह जमावाचा पोलीसांवर हल्ला, गेवराईतील तलवाडा येथे भयंकर प्रकार

रात्री झालेल्या वादळी वारे व पावसामुळे नद्यांना पूर आला. यांत तीन महिन्यापूर्वी पाचोड बु व पाचोड खूर्द या दोन गावांना जोडण्यासाठी गल्हाटी नदीवर पाचोड खूर्द गावांजवळ उभारलेले पुल खचून वाहून गेले. रात्री शेतातून व बाहेर गावाहून परतणाऱ्या व्यक्तींना पाणी ओसरेपर्यंत ताटकळत थांबावे लागले. तब्बल सहा तास सर्वत्र वाहतूक विस्कळीत होऊन ठेकेदाराच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे सर्वसामान्यासह परिसरातील नागरिकांना त्रास सोसावा लागला. उभारण्यात आलेल्या या नदीच्या पूलावर दोन्ही बाजूने अद्यापही संरक्षक कठडे बसविलेले नसल्याने मोठी दुर्घटना होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

. तसेच रात्रीच्या झालेल्या या पावसामुळे रात्री साडेनऊ वाजेपासून परिसरातील विज तब्बल बारा तास गायब राहीली. प्रत्येकवेळी पावसाची हजेरी लगताच विज सुटीवर जाऊन नागरिकांना अंधार व उकाडयाचा सामना करावा लागतो.

Marathwada: मराठवाड्यात जोरदार पाऊस, पाचोडचा पुल गेला वाहून; सहा तास वाहतूक विस्कळीत
Marathwada: सरपंचालाच चिखलात बसून आंदोलन करण्याची वेळ, वाचा नक्की काय आहे प्रकरण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com