मुरुड - शहरात सायंकाळपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे शहरातील काही भागात घरामध्ये पाणी शिरले असून बाजारातील काही दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. मोदी नगर भागातील नरसोबाच्या मंदिराचा मागील भाग कोसळला आहे. तर मुरुड पाडोळी रोडवरील मुरुडा नदीवरील पुलावरून स्विफ्ट डिझायर गाडी वाहून गेली आहे. सुदैवाने जीवित हानी झालेली नाही.
आज सकाळपासूनच आभाळ दाटून आलेले होते. सायंकाळी पाच वाजता दमदार पावसास विजेच्या कडकडाटासह सुरुवात झाली. सलग तीन चार तास झालेल्या मोठ्या पावसामुळे पाडोळी रोडवरील बाजारपेठेतील काही दुकानात पाणी शिरले. आंबीलपुरे फुटवेअर या दुकानात पाणी शिरून लाखो रुपयांचे नुकसान झाले. जुन्या पोस्ट ऑफिस जवळील फुलांची दुकाने व काही छोट्या दुकानातील पाणी शिरले आहे.
तसेच अचानक आलेले पाणी नालीतून वाहून न गेल्यामुळे दंडे व गाडे यांच्या घरात पाणी शिरून नुकसान झाले आहे. स्वराज कॉलनी भागातील काही भागातील पाणी शिरले आहे. बऱ्याच वर्षानंतर दत्तनगर भागात असलेल्या एकाच पावसाने पूर्ण भरला आहे. तलावाच्या जवळ असणाऱ्या वस्तीतील काही भागात पाणी शिरले आहे.
मुरुड पाडोळी रोडवरील मुरुडा नदीवरील पुलावरून स्विफ्ट डिझायर गाडी वाहून गेली आहे. प्रसंगावधान ता दाखवत चालक बाहेर आल्याने जीवित हानी झाली नाही. अद्याप पावसाचा जोर कायम असून असाच पाऊस राहिल्यास नुकसानीत वाढ होण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.