Beed Rain : हिवरा, देवळा परिसरात तुफान पाऊस! कांबळी नदीला पूर; पिके उद्ध्वस्त, पूल, रस्ते उखडले

Beed Rain : आष्टी तालुक्याला सोमवारी (ता. आठ) सायंकाळी मुसळधार पावसाने जोरदार तडाखा दिला.
Beed Rain : हिवरा, देवळा परिसरात तुफान पाऊस! कांबळी नदीला पूर; पिके उद्ध्वस्त, पूल, रस्ते उखडले
Updated on

आष्टी : तालुक्यातील हिवरा, सुलेमान देवळा, भोजेवाडी, पिंपरखेड परिसरात सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ढगफुटीसदृश पाऊस झाला. आष्टी, कडा, धामणगाव व धानोरा या चार मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जोरदार पावसाने परिसरातील पिके उद्धवस्त झाली. कांबळी नदीला पूर आल्याने हिवरा-दादेगाव, धानोरा-देवळा रस्त्यावरील पूल खचले असून रस्तेही उखडून गेले. दरम्यान, पाण्याच्या प्रवाहात पिंपरखेड येथील एक मोटारसायकलस्वार वाहून गेला होता, मात्र, सुदैवाने तो बचावला.

आष्टी तालुक्याला सोमवारी (ता. आठ) सायंकाळी मुसळधार पावसाने जोरदार तडाखा दिला. सोमवारी पाचच्या सुमारास तालुक्यात जोरदार पावसाला सुरवात झाली. रात्री उशिरापर्यंत हा पाऊस कोसळत होता. सायंकाळी साडेपाच ते आठ वाजेदरम्यान तालुक्यातील हिवरा, सुलेमान देवळा, अंभोरा, पिंपरखेड, भोजेवाडी या गावात ढगफुटीसदृश्य पाऊस कोसळला. या पावसाने खरीप हंगामातील बाजरी, कांदा, मूग, उडीद, सोयाबीन पिके अनेक ठिकाणी वाहून गेली आहेत. पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकरी वर्गाला पावसाची आस होती. मात्र, अचानक जोरदारपणे कोसळलेल्या पावसाने केलेल्या नुकसानीमुळे शेतक-यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाने कांबळी नदीला पूर येऊन हिवरा-दादेगाव, धानोरा-सुलेमान देवळा, भोजेवाडीकडे जाणारी वाहतूक रात्री ठप्प झाली होती.

Beed Rain : हिवरा, देवळा परिसरात तुफान पाऊस! कांबळी नदीला पूर; पिके उद्ध्वस्त, पूल, रस्ते उखडले
Rohit Sharma Retirement : ...तर मी थेट निवृत्ती घेईन! पाचव्या कसोटीनंतर कर्णधार रोहित शर्माने दिली मोठी हिंट

आष्टी (७३ मिलीमीटर), कडा (६८ मी.मी.), धामणगाव (८५.५ मी.मी.) व धानोरा मंडळात सर्वाधिक (१०३.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या चारही मंडळात अतिवृष्टी झाल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला असला तरी शेतकरी वर्गाला खरीप हंगामातील पिकांच्या मोठ्या नुकसानीस सामोरे जावे लागणार आहे.

दरम्यान, धानोरा- हिवरा रोडवर कांबळी नदीच्या पुलावर पिंपरखेड येथील बाळू चांगण हा युवक मोटारसायकलसह वाहून गेला होता. मात्र, सुदैवाने तो बचावला. नुकसानग्रस्त भागाची प्रशासनाने तातडीने पाहणी करून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावे; तसेच नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी सरपंच बाबासाहेब गोफणे, युवक नेते अमोल लगड यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.

Beed Rain : हिवरा, देवळा परिसरात तुफान पाऊस! कांबळी नदीला पूर; पिके उद्ध्वस्त, पूल, रस्ते उखडले
Pune Accident : मोटारीच्या धडकेत हवालदाराचा मृत्यू;पुण्यात ‘हिट अँड रन’चे आणखी एक प्रकरण

रस्ते, पूल उखडले

कांबळी नदीवरील हिवरा-दादेगाव रोडवरील पुलाला भगदाड पडले आहे. सहा महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून हिवरा- दादेगाव रोडचे काम झाले होते. अधिकाऱ्यांच्या संगनमताने ठेकेदारांनी रस्त्याचे काम निकृष्ट केले होते. याबाबत ग्रामपंचायत, ग्रामस्थांनी वेळोवेळी तक्रार केली होती. परंतु अधिकाऱ्यानी याकडे दुर्लक्ष केले.

हिवरा-दादेगाव रस्ता, पूल उखडला आहे. गावातील सिमेंट रस्ता वाहून गेला आहे. तरी या रस्त्याच्या कामाची चौकशी करून पुलासह रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अन्यथा आंदोलन छेडले जाईल. - सोमनाथ लगड, उपसरपंच, हिवरा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.