परभणी - महामार्ग पोलिसांच्या वतीने शुक्रवार, २५ ऑक्टोबरपासून हेलमेट सक्तीची मोहीम राबविली जाणार आहे. या मोहिमेंतर्गत ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या तसेच एका तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यात प्रवास करणाऱ्या सर्व मोटरसायकल चालकांना हेलमेट वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे.