शिरूरकासार : बहुप्रतीक्षित अहमदनगर-बीड-परळी रेल्वेमार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे. अंमळनेर ते विघ्नवाडी ३३ किमी लोहमार्गाचे काम पूर्णत्वास गेल्यानंतर मध्य रेल्वेकडून शुक्रवारी ( ता.९ ) जलदगती रेल्वे दाखल झाली. यावेळी रेल्वे कर्मचारी, अधिकारी यांचे ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात आले. रेल्वे पाहण्यासाठी नागरिकांनी ठिकठिकाणी गर्दी केली होती.