Hingoli News : तुम्ही पाडा, नाहीतर चालवू आम्ही हातोडा; धोकादायक इमारतींच्या मालकांना नोटीस

धोकादायक इमारतींचा प्रश्न पुढे येत आहे. नगर परिषद प्रशासनाच्या वतीने अशा इमारतींचा नुकताच सर्व्हे करण्यात आला असून, हिंगोली शहरात ५७ इमारती धोकादायक असल्याचे समोर आले आहे. या घर मालकांना प्रशासनाने नोटीस बजावल्या आहेत.
hingoli administration send notice to owners of dangerous buildings
hingoli administration send notice to owners of dangerous buildingssakal
Updated on

हिंगोली : शहरात धोकादायक इमारतींचा प्रश्न पुढे येत आहे. नगर परिषद प्रशासनाच्या वतीने अशा इमारतींचा नुकताच सर्व्हे करण्यात आला असून, हिंगोली शहरात ५७ इमारती धोकादायक असल्याचे समोर आले आहे. या घर मालकांना प्रशासनाने नोटीस बजावल्या आहेत.

पावसाळ्यात जुन्या, वास्तव्यासाठी धोकादायक बनलेल्या इमारतींचा सर्व्हे नगर परिषदेच्यावतीने करण्यात येतो. यावर्षी पावसाळ्यापूर्वी नगर परिषदेच्या पथकामार्फत सर्व्हे करण्यात आला. शहराच्या विविध भागांत ५७ इमारती वास्तव्यासाठी धोकादायक असल्याचे आढळून आले. विशेष म्हणजे, या इमारती धोकादायक बनल्या असतानाही त्यात नागरिकांचे वास्तव्य आहे.

पावसाळ्यात या इमारती केव्हाही पडण्याची शक्यता असल्यामुळे जीवितहानी होण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे नगर परिषदेच्यावतीने संबंधित घरमालकांना नोटीस बजावून या इमारती स्वतः पाडून घ्याव्यात, नाहीतर अशा इमारतींवर हातोडा चालवण्याची भूमिका पालिकेने घेतली आहे.

बहुतांश घरमालकांकडून नगर परिषदेच्या या नोटीसला गांभीर्याने घेतले जात नसल्याचे पाहावयास मिळत आहे. शहराच्या जुन्या भागात सर्वाधिक धोकादायक इमारती असल्याचे सर्व्हेतून पुढे आले आहे. मंगळवार गाडीपुरा, गवळीपुरा, कपडा गल्ली आदी भागांत जुन्या इमारतींची संख्या जास्त आहे.

भिंतीत पाणी मुरले तर पडण्याचा धोका

पावसाळ्यात काही इमारतीचा भाग कोसळला आहे; परंतु, त्यानंतरही नागरिक इमारतीत वास्तव्य करीत असल्याचे पाहावयास मिळते. पावसाळ्यात इमारतीच्या भिंतीत पाणी मुरले तर पडण्याचा धोका निर्माण होतो. अशा इमारती भाड्याने देऊ नयेत आणि स्वतःही वास्तव्य करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

पडझड होण्यास आलेल्या इमारतीत वास्तव्य धोक्याचे ठरू शकते. यासंदर्भात संबंधित घरमालकांना सूचना करण्यात येतात. परंतु, याकडे नागरिकांचे दुर्लक्ष होते. नागरिकांनी अशा इमारतीत वास्तव्य करू नये. ते इतरांसाठीही धोक्याचे ठरू शकते. यासाठी स्वतः इमारत पाडून घेणे गरजेचे आहे.

— अरविंद मुंडे, मुख्याधिकारी, नगर परिषद, हिंगोली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com