वसमत (जि.हिंगोली) : शहरा बाहेरुन जाणाऱ्या वसमत-औंढा नागनाथ (Aundha Nagnath) रस्त्यावर प्रतिबंधित असलेला सुगंधीत गुटखा व कार मिळून तब्बल साडेसहा लाखांचा मुद्देमाल ग्रामीण पोलीसांनी गुरुवारी (ता.१६) सायंकाळी चारच्या सुमारास पकडला. यावेळी एक आरोपी पोलीसांनी पकडला तर दोन आरोपी फरार झाले. या कारवाईमुळे पुन्हा एकदा अर्धापुर-वसमतचे गुटखा कनेक्शन उघड झाले आहे. याबाबत वसमत ग्रामीण पोलीसांनी (Vasmat Rural Police) दिलेल्या माहितीनुसार, शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधी गुटखा अर्धापूर येथून कारद्वारे वसमतला येत असल्याची माहिती (Hingoli) पोलीसांना होती. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक विलास चवळी यांच्या (Ardhapur) मार्गदर्शनाखाली गुरुवारी सायंकाळी ४ च्या सुमारास पोलीस जमादार अविनाश राठोड, अंबादास विभुते, श्री नरवाडे यांच्या पथकाने पाळत ठेवून वसमत-औंढा नागनाथ रस्त्यावरील कौठा टी पाँईंट जवळील गुळाच्या कारखानासमोर कार (एमएच १२ एनबी ३५०१) गुटखा घेऊन येत असल्याचे दिसले. (Hingoli Crime Gutkha Along Car Seized In Vasmat)
कार थांबवून तपासणी केली असता आतमध्ये पांढऱ्या रंगाचे गुटख्याने भरलेले पोते आढळून आले. पोलीसांचा सुगावा लागताच कारमधील तीनपैकी दोन आरोपी फरार झाले तर एकास पोलीसांनी ताब्यात घेतले. तसेच १ लाख ९५ हजारांचा सुगंधीत पान मसाला व ४८ हजार ७५० रुपयांचा जर्दा तसेच एक पांढऱ्या रंगाची कार ज्याची किमत ४ लाख रुपया असा एकुण ६ लाख ४३ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक विलास चवळी यांच्या तक्रारीवरुन आरोपी शेख सिकंदर शेख खाजा (रा.नयी आबादी काजी मोहल्ला, अर्धापुर, जि.नांदेड), शेख बबलू शेख वहाब, शेख माजीद शेख वहाब (दोघे राहणार शुक्रवार पेठ वसमत) यांच्यावर महाराष्ट्र शासनाने उत्पादन, वितरण, विक्रीस प्रतिबंध केलेल्या गुटखा बंदी कायदाअंतर्गत (Nanded) वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. जमादार अविनाश राठोड पुढील तपास करीत आहेत .
वसमत-अर्धापुर गुटखा कनेक्शन पुन्हा उघड
मागील काही महिन्यांपासून अर्धापूर येथून माफियामार्फत वसमत व औंढा येथे मोठ्या प्रमाणात गुटखा वितरीत होत असल्याची नागरिकांमध्ये चर्चा होती. ग्रामीण पोलीसांनी अर्धापूर येथून आलेला लाखो रुपयांचा गुटखा पकडून अवैध गुटखा विक्रीचे अर्धापुर वसमत कनेक्शन पुन्हा उघड झाले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.