हिंगोली : जिल्ह्यात हिंगोली, वसमत, व कळमनुरी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत सायंकाळी पाचपर्यंत ६१.१८ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची प्रक्रिया पूर्ण होताच आकडेमोडीला सुरवात झाली असून, प्रमुख उमेदवार गावनिहाय झालेल्या मतदानाची माहिती संकलित करून त्याचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न सुरू आहे.