हिंगोली : जिल्ह्यातील शेतकऱ्यांची वीज बिलाची सक्तीची वसुली थांबवावी, वीज कनेक्शन कट करु नये, अशा मागणीचे निवेदन शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने वीज वितरण कंपनीकडे शुक्रवारी (ता. २५) देण्यात आले.
जिल्हाप्रमुख विनायकराव भिसे पाटील यांच्या उपस्थितीत उद्धवराव गायकवाड, आनंदराव जगताप, डॉ. रमेश शिंदे, भानुदासराव जाधव, शंकरराव घुगे, दत्तराव उबाळे, गोविंदराव मुटकुळे, संदीप तनपुरे, बाळू मगर, शिवाजीराव सरकटे, राजूभाऊ पाटील, आसिफ पठाण, अशोक जगताप, करण मुदीराज, संतोष साळवे, अमर खंदारे आदी शिवसैनिकांनी निवेदन दिले. निवेदनात नमूद केले आहे की, सक्तीची वीज वसुली थांबवावी. वीज भारनियमनाच्या वेळा कमी करून शेती पंपाची वीज ही सकाळी ६ ते रात्री ६ वाजेपर्यंत उच्च दाबाने सुरळीत करण्यात यावी.
रोहित्र (ट्रॉन्सफार्मर) त्वरित दुरुस्ती करून देण्यात यावे. वेळीच मागण्यांची दखल घ्यावी, अन्यथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख विनायकराव भिसे पाटील यांच्या वतीने विद्युत वितरण कंपनी (हिंगोली) कार्यालयासमोर ३० नोव्हेंबर रोजी सकाळी रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.