हिंगोली : शहरात आतापर्यत अनेक बंद पुकारण्यात आले परंतू अद्यापही बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला नाही मात्र रविवारी (ता.22) पुकारण्यात आलेल्या जनता कर्फ्युला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला सकाळपासून नेहमी वर्दळीचे असलेले सर्वच रस्त्यावर शुकशुकाट होता. कोरोना गो म्हणत नागरीकांनी
घरात राहणेच पसंत केले.
कोरोनाचा संसर्ग रोखावा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्युचे आवाहन केले होते. या आवाहनाला हिंगोलीतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळेच नेहमी गजबजलेले रस्ते आज निर्मनुष्य झाल्याचे दिसत आहे. रुग्णालय, मेडिकल, दुकाने या अत्यावश्यक सेवा वगळता शहरातील सर्व दुकानाचे शटर डाऊन होते.
येथे क्लिक करा - अवयवदानाचे प्रचारक : माधव अटकोरे
पोलिसाची वाहने शहरात गस्त घालत
खासगी वाहनाबरोबरच एसटी बस, ऑटोरिक्षा अशी वाहने देखील रस्त्यावर धावताना दिसली नाही. त्यामुळे रस्त्यावर शांतता पहायला मिळत आहे. काही अपवादात्मक स्थितीत वाहने रस्त्यावर दिसलीच तर पोलीस या वाहन चालकांना अडवत आहेत. व विचारण करत होते. तसेच आवश्यक काम असेल तरच बाहेर पडा, असे पोलिसही सांगताना दिसत आहेत. पोलिसाची वाहने शहरात गस्त घालत होती. स्पीकरवरून सतत मार्गदर्शना व सुचना दिल्या जात होत्या. शहरात सकाळीच येणारे दुधविक्रेत देखील आज भल्या पहाटे येवून सातच्या पुर्वीच निघून गेले.
राष्ट्रीय महामार्ग देखील सुनसान
गल्लोगल्ल्ली सकाळी, मटकी, व विविध कडधान्य विक्रेते भाजी विक्रेते, ब्रेड व्रिकेत्याचे घुमणारे आवाज देखील बंद झाले होते. शहरातून जाणारा अकोला ते हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग देखील सुनासुना होता. शहरात सकाळीच पुर्णा ते अकोला व अकोला ते पुर्णा जाणाऱ्या पॅसेंजर गाड्या धावल्याच नसल्याचे नसल्याने शहरात येणारे गावकरी देखील आलेच नाहीत. यामुळे शहरात सर्वत्र शुकशुकाट दिसत होता.
नागरीकांनी घरात राहणे पसंत करत
नागरीकांनी घरात राहणे पसंत करत व्हॉटअसपच्या माध्यमातून एकमेंकांना ख्याली खुशालीची चौकशी करत होते. सोशलमिडीयावर सर्वाचे लक्ष होते. कोठे काय सुरू आहे याची अपडेट माहिती घेण्यात सर्वजण मग्न झाले होते. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवार अत्यावश्यक सेवा वगळता देशाभरात जनता कर्फ्यू पाळत नागरिकांना सकाळी सात वाजल्यापासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत स्वत:हून संचारबंदी पाळावी असे आवाहन केले आहे. याला प्रतिसाद देत शनिवारीपासूनच सुरवात झाली
होती.
येथे क्लिक करा - तुराट्यांचे सरण पेटवून शेतकऱ्याने घेतली उडी...
जिल्ह्यातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद
तसेच जिल्हाधिकारी यांनी केलेल्या आवाहनाला जिल्ह्यातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.
त्यानुसारच पंतप्रधानांनी केलेल्या जनता कर्फ्यूचे आवाहनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. त्याकरीता नागरिकांनी सकाळी सात वाजल्यापासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत या कालावधीत घराबाहेर पडता स्वत:हून संचारबंदी पाळून कोरोना विषाणू विरुध्द लढा देण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले होते त्याला देखील नागरीकांनी प्रतिसाद देत यात सहभाग नोंदविला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.