हिंगोली : दहा गटांत राहणार महिलाराज

कळमनुरी तालुक्यात १२ गटांपैकी दहा गट विविध प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित
Zilla Parishad elections
Zilla Parishad electionssakal
Updated on

कळमनुरी - जिल्हा परिषदेच्या गटांचे आरक्षण जाहीर झाले आहे. यामध्ये तालुक्यातील एकही जागा सर्वसाधारण गटाला सुटली नाही. यामुळे प्रस्थापित व संभाव्य इच्छुकांच्या अपेक्षा मावळल्या गेल्या आहेत. तालुक्यातील बारा गटांपैकी दहा गट विविध प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित झाले आहेत. यामुळे जिल्हा परिषदेत तालुक्याचे नेतृत्व करणाऱ्या नेते मंडळीचे राजकारण संकटात सापडले आहे. काहींनी आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी मर्जीतल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या कुटुंबामधील महिला उमेदवाराचा शोध चालविला आहे.

आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून जिल्ह्यामधील एकूण ५७ गटांकरिता आरक्षण सोडत काढण्यात आली. यामध्ये २९ गट महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले. आयोगाकडून ठरवून देण्यात आलेल्या निर्देशाप्रमाणे आरक्षण काढण्यात आल्यानंतर जिल्हा परिषदेत राजकारण करणाऱ्या अनेक मातब्बर नेतेमंडळीचा हक्काचा आपला गट आरक्षित झाल्याने यामध्ये अनेकांचा हिरमोड झाला आहे.

त्यातही जिल्हा परिषदेत तालुक्याचे नेतृत्व करणाऱ्या नेतेमंडळींना पुढील पंचवार्षिक योजनेत पडद्यामागे राहूनच राजकीय समाजसेवा करावी लागणार आहे. आरक्षणाचा सर्वाधिक फटका तालुक्यातील सर्वसाधारण जागेला बसला आहे. तालुक्यातील एकूण बारांपैकी एकही जागा सर्वसाधारण गटाकरिता सुटली नाही.

त्यामुळे अनेकांच्या अडचणीत वाढ झाली तर दुसऱ्या बाजूला तालुक्यातील एकूण १२ पैकी दहा जागा विविध प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित झाल्यामुळे या नेतेमंडळींच्या उरल्या- सुरल्या आशाही संपुष्टात आल्या आहेत. हिरमोड झालेल्या नेतेमंडळीने आता जिल्हा परिषद गटात आपले राजकारण जिवंत ठेवण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत.

किमान निवडणुकीत आपण उमेदवार नसलो तरी आरक्षण सुटलेल्या प्रवर्गामधील आपल्या हक्काचा व ऐकण्यातला उमेदवार असला पाहिजे, या दृष्टीने त्या उमेदवाराच्या आडून आगामी काळात आपली राजकीय समाजसेवा सुरू राहिली पाहिजे, याकरिताही अनेकांनी आता राजकीय हालचाली सुरू केल्या आहेत. एकंदरीत जिल्हा परिषद गटाच्या आरक्षणामध्ये अनेक मातब्बर नेतेमंडळीला झटका बसला असून, काही ठिकाणी सोयीच्या असलेल्या गटामधून नेतेमंडळींनी आपल्या अथवा कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या कुटुंबातील महिला सदस्यांना निवडणुकीत संधी देण्याची चर्चा सुरू केली आहे.

सर्वसाधारण गटासाठी असलेल्या जागा

आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी काढण्यात आलेल्या आरक्षणामध्ये हिंगोली व कळमनुरी तालुक्यात सर्वसाधारण गटासाठी महिला वगळून एकही जागा सुटली नाही. सेनगाव तालुक्यातील एक, औंढा तालुक्यात पाच, वसमत तालुक्यात नऊ जागा सर्वसाधारण गटासाठी सुटल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.