हिंगोली : दीपावलीच्या सुट्यानंतर सुरू झालेल्या मोंढ्यात शेतमालाची आवक सुरू झाली आहे. मंगळवारी एक हजार क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी आले होते. मात्र, भाव चार हजार १४७ रुपये मिळाला. भावात दीडशे ते दोनशे रुपयांची घट झाली आहे..मोंढ्यात सोयाबीनची आवक एक हजार क्विंटल झाली. सरासरी भाव चार हजार १४७ रुपये, उडिदाची तीस क्विंटल आवक झाली असून सरासरी भाव सहा हजार २७५ रुपये, तुरीची आवक वीस क्विंटल झाली. तुरीला सरासरी भाव आठ हजार ५८० रुपये, मुगाची आवक १५ क्विंटल झाली. मुगाला सरासरी भाव नऊ हजार ८५० रुपये, तर, हरभऱ्याची आवक ५० क्विंटल झाली असून सरासरी भाव सहा हजार ३८० रुपये होता. हळदीची पाचशे क्विंटल आवक झाली असून सरासरी भाव १२ हजार १४५ रुपये भाव होता..सोयाबीन च्या भावात दीडशे ते दोनशे रुपयांची घसरण झाली आहे. यापूर्वी सोयाबीनला चार हजार चारशे ते साडेचार रुपयांपर्यंत भाव होता. दीपावली सुट्यांनंतर सोमवारपासून मोंढा सुरू झाला आणि मंगळवारी सोयाबीन एक हजार, तर हळद पाचशे क्विंटल विक्रीसाठी उपलब्ध झाली. सोयाबीन चार हजार १४७ रुपये, तर हळदीला १२ हजार १४५ रुपये प्रमाणे सरासरी भाव मिळाला. यासह मूग, उडीद, तूर देखील विक्रीसाठी आली होती.- नारायण पाटील, सचिव, बाजार समिती हिंगोली.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.