Hingoli : प्रभागनिहाय होणार कर वसुली

हिंगोलीत मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांचा पुढाकार
Hingoli नगर परिषदेची वसुली मोहीम
Hingoli नगर परिषदेची वसुली मोहीम sakal
Updated on

हिंगोली : शहरातील अनेक नागरिकांकडे नगर पालिकेची थकबाकी रक्कम असल्याने कर्मचारी वारंवार कर वसुलीसाठी घरोघरी जात आहेत. मात्र, प्रतिसाद मिळत नसल्याने आता प्रत्येक प्रभागनिहाय शिबिर घेऊन नागरिकांच्या घरपट्टी, नळपट्टीची कर वसुली केली जाणार आहे. याचे योग्य नियोजन मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांनी केले आहे.

हिंगोली शहरात २२ हजार ६२८ मालमत्ता धारकांची नोंद असून, त्यांच्याकडे मालमत्ता संदर्भात सहा कोटी ३९ लाख रुपये आणि पाणी पट्टीकर वसुली दोन कोटी ६५ लाख रुपये अशी कर वसुली आहे. प्रत्येक वेळी मार्च महिना जवळ आल्यानंतर उद्दिष्टपूर्ती करण्यासाठी नगर पालिकेच्या माध्यमातून कर वसुलीवर अधिक भर दिला जातो. त्यापूर्वी नागरिकांना मागणी पत्र देऊन कर तत्काळ कर भरण्याच्या सूचना दिल्या जातात. पण, अनेक नागरिक कर भरण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने नगर पालिकेचे अधिकारी व कर्मचारी वारंवार नागरिकांच्या घरोघरी जाऊन कर वसुली भरण्यासाठी आवाहन करतात.

परंतु, नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने उद्दिष्टपूर्ती होत नाही. परिणामी, कर्मचारी अडचणीत येतात. या पार्श्वभूमीवर आता शहरातील १७ प्रभागांत कर वसुली करण्यासाठी शिबिरे घेतली जाणार आहेत. त्यासाठी मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांनी उपमुख्याधिकारी उमेश हेंबाडे, नगर अभियंता रत्नाकर अडशिरे, अभियंता सनोबर तसनिम, स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर यांचे पर्यवेक्षीय पथक स्थापन केले आहे.

दररोज सहा प्रभागांत शिबिर घेण्यासाठी कर्मचाऱ्यांचे सहा पथके तैनात करण्यात आली असून, सकाळी ८ ते १० या वेळेमध्ये कर्मचारी शिबिरात कर वसुली करणार आहेत. नंतर नगर पालिकेच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होऊ नये, या उद्देशाने कर्मचारी कार्यालयीन वेळेत नगर पालिकेत उपस्थित राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.