देवगावफाटा - महावितरण कंपनीच्या विद्युत वाहिन्यांचे जाळे ग्रामीण भागातील दुर्गम गावखेड्यापर्यंत पसरले आहे. त्यांची नेहमी देखभाल व दुरुस्ती करणे गरजेचे आहे. मात्र महाविरतण कंपनीतील अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे ग्रामीण भागात उघड्या डीपी व लोंबकळणाऱ्या तारा धोकादायक स्थितीत असल्याचे चित्र दिसत आहे.
ग्रामीण भागात ठिकठिकाणी महाविरतणच्या वीज पुरवठा यंत्रणेची अवस्था बिकट झाली आहे. अनेक गावांत रोहीत्रांवरील उघड्या पेट्या मृत्यूला निमंत्रण देत आहेत.
तसेच विजेच्या खांबावर वाढलेल्या वेली, झाडांच्या फांद्यामध्ये गुंतलेल्या विद्युत तारा, उघड्या डीपी बॉक्समुळेही अपघाताची शक्यता वाढली आहे. यातच पावसाळ्याचे दिवस असल्याने अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तसेच शेतीला वीजपुरवठा करणाऱ्या विद्युत ताराही लोंबकळत असून, वादळी वाऱ्यात या तारांचे घर्षण होऊन जमिनीवर गुल पडत आहे. त्यामुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्याच्या घटना यापूर्वीही अनेकवेळा घडल्या आहेत.
खासगी व्यक्तींकडून कामे
अनेक ठिकाणी महाविरतणचे कर्मचारी देखभाल दुरूस्तीकडे लक्ष देत नाहीत. पर्यायाने शेतकऱ्यांना खासगी व्यक्तींकडून कामे करून घ्यावी लागतात. याकडे महाविरतणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
शॉटसर्किची शक्यता
पावसाळ्यापूर्वी महाविरतणने ज्या ठिकाणी विजतारा, खांब, डीपी यांना झाडाच्या फांद्या लागत असतील अशी झाडे, वेली छाटण्याचे काम करणे अपेक्षित आहे. परंतु, महाविरतणच्या दुर्लक्षामुळे आता एका तारेचा प्रवाह दुसऱ्या तारेत जाऊन शॉर्टसर्किट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.