Hingoli Rain | औंढा नागनाथमधील सात गावांचा संपर्क तुटला

औंढा नागनाथ तालुक्यात सलग पाच दिवसांपासून पाऊस सुरू आहे.
Hingoli Rain News
Hingoli Rain Newsesakal
Updated on

औंढा नागनाथ (जि.हिंगोली) : तालुक्यात सलग पाच दिवसांपासून पाऊस सुरू आहे. या पावसाने नदी-नाल्याना पाणी आले आहे. बुधवार (ता.१३) संततधार पावसाने जामगव्हाण गावाजवळील ओढ्याला पूर आल्याने त्याचे पाणी पुलावरुन जात असल्याने सात गावचा संपर्क तुटला आहे. औंढा नागनाथ (Aundha Nagnath) तालुक्यात पाच दिवसांपासून पाऊस सुरू आहे. बुधवारी देखील सकाळपासून पाऊस सुरू होता. या पावसाने जामगव्हाण गावाजवळून वाहणाऱ्या ओढ्याला पूर आल्याने पुलाचा एक भाग तुटला आहे. (Hingoli Rain News Seven Villages Connectivity Discontinue In Aundha Nagnath Taluka)

Hingoli Rain News
Parbhani | परभणीतील तीन तालुक्यात अतिवृष्टी, चौथ्या दिवशीही संततधार

यामुळे कंजारा, पूर, वसई येडूद, हिंगणी, टाकळगव्हाण, रेणापूर या गावाकडे जाणारा ओढ्यावरील पुल पावसाच्या पाण्यामुळे तुटला असून या रस्त्यावरील सात गावांचा संपर्क तुटला आहे. हा पुल काही दिवसांपूर्वीच बांधण्यात आला होता. त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने पावसाच्या पाण्यामुळे पुल तुटला आहे, असे गावकरी सांगत आहेत.

Hingoli Rain News
'संजय लीला भन्साळींनी मला सिनेविश्वात आणले अन् कलाकार म्हणून घडवले'

या मार्गावर असलेल्या कंजारा, पूर, वसई येडूद, हिंगणी, टाकळगव्हाण, रेणापूर या गावाकडे जाण्याचा संपर्क सध्या तुटलेला आहे. तसेच औंढा तालुक्यातील निशाना पुरजळ, असोला, कोडशी या पुलावरुन पाणी वाहत आहे. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पुलावरून पाणी वाहत असताना नागरिकांनी व वाहनधारकांनी पूल ओलांडण्याचे धाडस करू नये, असे आवाहन तहसीलदार डॉ. कृष्णा कानगुले यांनी केली आहे. (Hingoli Rain News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.