हिंगोली : ‘त्या’ जुगाऱ्यांवर आता होणार कठोर कारवाई

पोलिस अधीक्षक कलासागर यांचे बैठकीत आदेश
hingoli
hingolisakal
Updated on

हिंगोली : जिल्ह्यातील गणेश मंडळांच्या ठिकाणी जुगारअड्डे खपवून घेतले जाणार नाहीत. या ठिकाणी जुगार खेळणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, असे आदेश पोलिस अधीक्षक राकेश कलासागर यांनी दिले आहेत.

आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ठाणेदारांची बैठक मंगळवारी (ता. १६) येथील पोलिस अधीक्षक कार्यालयात झाली. यावेळी सहायक पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांच्यासह ठाणेदारांची उपस्थिती होती. गणेश मंडळाच्या ठिकाणी जुगार खेळला जात असल्याच्या तक्रारी प्राप्त होतात. यावर्षी एकही तक्रार प्राप्त होता कामा नये. मंडळाच्या ठिकाणी जुगार खेळणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. तसेच गणेश मंडळांच्या ठिकाणी बंदोबस्त ठेवावा. याशिवाय स्वतंत्र गस्तीपथके नियुक्त करण्याच्या सूचनाही पोलिस अधीक्षक कलासागर यांनी यावेळी दिल्या. गणेश मंडळांनीही पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे. मंडळाच्या कार्यकारिणी मधील एक व्यक्ती २४ तास गणेश मंडळाच्या ठिकाणी कार्यरत राहील, याची खबरदारी घ्यावी.

तसेच गणेश मूर्ती स्थापनेसाठी सहाय्यक धर्मादाय आयुक्त तसेच पोलिस विभागाची परवानगी घ्यावी, असेही सांगण्यात आले. शासनाच्या निर्देशानुसार ध्वनिक्षेपक लावावा. रात्री दहा वाजल्यानंतर ध्वनीक्षेपक सुरू राहणार नाही, याची काळजी गणेश मंडळांनी घ्यावी, पोलिसांनीही त्यावर लक्ष ठेवावे. आगामी सण उत्सव शांततेत साजरे करण्यासाठी नागरिकांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे.

तसेच जिल्ह्यात एक गाव एक गणपती ही संकल्पना राबविण्यासाठी पोलिस विभागाने पुढाकार घेऊन प्रत्येक गावात जनजागृती करावी. त्यासाठी प्रत्येक गावात गणेश मंडळांच्या बैठका घेऊन त्यांना एक गाव एक गणपती या उपक्रमाचे महत्त्व पटवून द्यावे. पोलिस पाटील व गाव पातळीवरील कर्मचाऱ्यांच्या बैठका घ्याव्यात, अशा सूचनाही पोलिस अधीक्षक कलासागर यांनी दिल्या.

पोलिस पाटलांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना पोलिस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे.औंढा नागनाथयेत्या काही दिवसांवर पोळा सणासह गणेश उत्सव आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील पोलिस पाटील याची बैठक बुधवारी (ता. १७) औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात घेण्यात आली.

यावेळी पोलिस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस पाटील यांनी सतर्क राहावे. त्याच बरोबर गावात एक गाव एक गणपती संकल्पना राबवण्यात पोलिस पाटील यांनी पुढाकार घ्यावा. यावेळी जी. डी. मुळे, शफी नदाफ, सिद्धीक इनामदार, बाळासाहेब साळवे, सुनील मोरे, अरविंद मुळे, आक्रम खतीब, सुरेश टारफे, शेखा वहीद, गंगाधर देवकते, दत्ता शेगुकर, विलास काचगुंडे, दिनकर मंडलिक, रावसाहेब ठोंबरे, गुलाबराव पोले, जनार्दन तळणकर, संतोष शिंदे, दीपक आंबोरे, अंबादास काटे, अशोक पोटे, आनंद धनवे, सुधाकर आघाव आदींची उपस्थिती होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()