हिंगोली : आधुनिक शेती अवजारांमुळे पारंपारिक अवजारे नामशेष

कमी मेहनतीत झटपट कामातून खर्च वाढले; शेतकरी
Hingoli Traditional Farming Tools and Implement extinct modern farming implement
Hingoli Traditional Farming Tools and Implement extinct modern farming implementsakal
Updated on

औंढा नागनाथ : शेतीच्या मशागती पासून ते पीक घरी येईपर्यंत पारंपारिक शेती अवजाराची जागा आधुनिक तंत्रज्ञानातून उदयास आलेल्या आधुनिक शेती अवजार यांनी घेतल्यामुळे वर्षां वर्षापासून चालत आलेली पारंपारिक शेती अवजारे जवळपास नामशेष होण्याच्या मार्गावर असून नांगर, वखर, कोळपणी व बैलजोडी बाळगणे म्हणजे अतिरिक्त ताण या विचाराने कमी मेहनतीत झटपट कामाच्या नादात खर्च अनेक पटीने वाढल्याचे शेतकरी सांगत आहेत.

पुर्वीच्या काळापासून ते मागील काही वर्षात शेतीच्या मशागतीची संपूर्ण कामेही बैलजोडीच्या साह्याने केल्या जात होती. नांगरणी, वखरणी, कोळपणी तसेच पेरणी व लागवडीसाठी फुल्ली पाडणे असो, या कामात पारंपारिक शेती अवजाराचा वापर केल्या जात असे. पारंपारिक शेती अवजारांची जागा आता ट्रॅक्‍टरच्या साह्याने होत असलेल्या पणजी व रोटावेटर या आधुनिक मशागतीच्या साधनांनी घेतली. या मुळे शेतकऱ्यांच्या खर्चात प्रचंड वाढ झालेली असल्याने उत्पन्नापेक्षा खर्च जास्त अशीच काहीशी परिस्थिती ग्रामीण भागात अनुभवायला मिळत आहे.

कालांतराने लाकडी नांगराची जागा लोखंडी नांगराने घेतली. तर बैलजोडीच्या साह्याने ओढल्या जाणाऱ्या या शेती अवजाराची जागा आता ट्रॅक्टरने घेतली असून कधीकाळी केवळ मेहनतीच्या बळावर होणारी कामे आता विकतची बनली आहेत. यासाठी एका एकर जमिनीच्या नांगरणीसाठी तब्बल आठशे ते हजार रुपये शेतकऱ्यांना मोजावे लागत असून तेवढेच पैसे वखरणीसाठीही लागत आहेत.

आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने शेतकऱ्यांची अनेक दिवसांची कामे अगदी काही तासात होत असली तरी पेरणी व कोळपणी यासारख्या अत्यावश्यक कामासाठी आजही बैलजोडी व पारंपारिक शेती अवजारांचीच गरज असल्याने मशागत व इतर कामासाठी लागणारा अतिरिक्त ताण व एकंदरीत खर्च पाहता जुनं ते सोनं म्हणण्याची वेळ शेतकरी वर्गावर येऊन ठेपली आहे.

बैलजोडी नसल्याने शेतीची मशागत पैसे मोजून ट्रॅक्‍टरच्या साह्याने होत असली तरी काकरं पाडणे तसेच डवरणी ही सर्व कामे करण्यासाठी आता बैलजोडी असलेल्या शेतकऱ्याच्या भरवशावरच राहावे लागते. पिकांत कोळपणीसाठी जर एखादा आठवडा जास्तीचा लागला तर अशा परिस्थितीत डवरणी नंतरही निंदनाचा अतिरिक्त खर्च सोसावा लागतो. तर इतरांच्या भरवशावर शेतीची कामे केली तर अतिरिक्त खर्चही वाढतो.

- आनंदराव सांगळे, शेतकरी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.