Hingoli : एका माणसामागे आता तीन झाडे लावणे गरजेचे!

लोकसंख्येच्या प्रमाणात झाडांची संख्या कमीच
Tree
Treesakal
Updated on

हिंगोली : जिल्ह्यात यंदा ३९ लाख ६० हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी सहा लाख ६४ हजार वृक्षलागवड झाली आहे. लोकसंख्येच्या तुलनेत जिल्ह्यात एका माणसा मागे तीन झाडे लावणे गरजेचे आहे. जिल्ह्याची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार ११ लाख ७८ हजार ९७३ आहे. जिल्ह्यात २८ हजार ६३९ हेक्टर वनक्षेत्र असून, भौगोलिक क्षेत्र चार हजार ५२६ किलोमीटर आहे. जिल्ह्याचे वार्षिक पर्जन्यमान ९० मिलिमीटर आहे.

जिल्ह्यात २०१६ ते २०१९ कालावधीमध्ये लागवड केलेल्या रोपांमुळे वनक्षेत्रात बदल दिसून येत असला तरी जिल्ह्यात लोकसंख्येच्या प्रमाणात झाडांची संख्या कमी आहे. जिल्ह्यात असलेल्या वनक्षेत्रामुळे चिवट, तडस, लांडगा, कोल्हा, हरिण, नीलगाय, घोरपड, चिंकारा आदींसह मोर, भार, सर्प, गरुड, ससाणा, घुबड हे पक्षी वास्तव्यास आहेत.

जिल्ह्यात प्रामुख्याने साग, लिंब, अंजन, चारोळी, जांभूळ, खैर, हिवर, बोर, आवळा, खिरणी, सीताफळ, करंज, उंबर, शमी, अमलतास, पांगरा, महासागरगोश, हिरडा, बेहडा, शिवण झाडांमध्ये वाढ झाली आहे. ही वाढ कायम स्वरुपी टिकवून ठेवणे गरजेचे आहे.

सध्या लोकसंख्येच्या प्रमाणात झाडांची संख्या वाढविणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील वातावरणात लिंब, पिंपळ, वड, करंज, बेल या झाडाची चांगली वाढ होऊ शकते, असे विभागीय वनाधिकारी बाळासाहेब कोळगे यांनी सांगितले. जिल्हा परिषदेने यात सहभागी होत २५ गावांमध्ये किमान २५ हजार वृक्ष लागवड करण्याचा निर्णय उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विशाल राठोड यांनी घेतला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षलागवडीचा उपक्रम राबवून गावांना ऑक्सिजनमधून संजीवनी उपलब्ध होणार आहे. यासाठी स्थानिक पातळीवर ग्रामपंचायत, अंगणवाडी, शाळा, आरोग्य उपकेंद्र या सोबतच इतर शासकीय कार्यालयांच्या मदतीने वृक्ष लागवडीचा उपक्रम राबवला जाणार आहे. त्यासाठी सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने रोपे उपलब्ध केली जाणार आहेत.

हरित हिंगोलीसाठी झाडांची गरज

झाडे लावण्याच्या उपक्रमात गावकऱ्यांचाही सहभाग घेतला जाणार असून, गावातील प्रत्येक कुटुंबांना काही झाडे दत्तक देऊन त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी सदरील कुटुंबावर सोपवली जाणार आहे. हिंगोली जिल्हा हरित करण्यासाठी प्रत्येकाने किमान तीन झाडे लाऊन त्याचे संगोपन करणे गरजेचे असल्याचे श्री. कोळगे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.