हिंगोली : ट्रक, आयशर टेम्पोच्या समोरा समोर धडकेत तीन ठार

हिंगोली ते कनेरगावनाका मार्गावरील घटना
Accident
Accidentsakal
Updated on

हिंगोली : हिंगोली ते कनेरगावनाका मार्गावर कलगाव पाटीजवळ भरधाव ट्रक व आयशर टेम्पोच्या समोरा समोर झालेल्या धडकेत तीन जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी ता. ३१ मध्यरात्री घडली आहे.

Accident
Budget 2022 : अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा वाचा एका क्लिकवर

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाशीम येथून एका आयशर टेम्पो मोसंबी घेऊन नांदेडकडे निघाला होता. सदर टेम्पो हिंगोली ते कनेरगावनाका मार्गावर कलगाव पाटी जवळ आला असतांना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने क्रमाक आरजे २१ जीए ५५३२ टेम्पोला धडक दिली. या अपघातात ट्रकमधील दोघेही ठार झाले त्यापैकी चालकाचे नांव महेमुदखान रा.नागौर (राज्यस्थान) असून अन्य एकाचे नांव समजू शकले नाही. तर टेम्पोमधील पवन गायकवाड रा. नांदेड याचा मृत्यू झाला.

तर करण कदम हा गंभीर जखमी झाला. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधिक्षक विवेकानंद वाखारे , हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक आर.एन. मळघने , उपनिरीक्षक श्री. मुपडे , सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल भडंगे रवीकांत हरकाळ, आकाश पंडीतकर,अशोक धामणे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन जखमी किरण यास उपचारासाठी हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचार करून नांदेडला हलविले आहे .

Accident
विराटच्या 'या' निर्णयाचा मला धक्काच बसला : पाँटिंग

या अपघातामुळे हिंगोली ते कनेरगावनाका मार्गावरील वाहतुक विस्कळीत झाली होती . पोलिसांनी रात्रीच क्रेन बोलावून वाहने रस्त्याच्या बाजूला केल्यानंतर वाहतुक सुरळीत झाली . याप्रकरणी पोलिस ठाण्यात नोंद झाली नाही तर ट्रकमधील एका मयताची ओळख पटविण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.