Hingoli Fire Accident : हिंगोली जिल्हा परिषदेच्या इमारतीला आग, अग्निशमन दलाचे आगीवर वेळीच नियंत्रण

हिंगोली जिल्हा परिषदेच्या इमारतीला बुधवारी ता.२२ दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली
Hingoli Fire Accident
Hingoli Fire AccidentSakal
Updated on

हिंगोली : हिंगोली जिल्हा परिषदेच्या इमारतीला बुधवारी ता.२२ दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली. मात्र पालिकेच्या सतर्कतेने आगीवर वेळीच नियंत्रण मिळविल्यामुळे दुर्घटना टळली. या आगीमध्ये व्हिसी हॉल मधील साहित्य जळून खाक झाले आहे.

हिंगोली जिल्हा परिषदेमध्ये बुधवारी दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास अधिकारी व कर्मचारी काम करीत बसले होते. यावेळी अचानक शॉर्ट सर्किटमुळे मोठा आवाज झाला त्यानंतर आग भडकली. यामध्ये व्हिसी हॉलमध्ये लाकडी साहित्य व हमी योजनेची जूनी कागदपत्रे असल्यामुळे आग अधिकच भडकत केली. इमारतीला आग लागल्याचे लक्षात येताच अधिकारी व कर्मचारी तातडीने कार्यालयाच्या बाहेर पडले.

या घटनेची माहिती मिळताच हिंगोली पालिकेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे, अग्नीशमनदलाचे व्यवस्थापक बाळू बांगर यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पालिकेच्या दोन अग्नीशमन दलाने काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळविले.

मात्र तो पर्यंत व्हिसी हॉलमधील साहित्य जळून खाक झाले होते. पालिकेच्या सतर्कतेमुळे या आगीची झळ इतर विभागांना बसली नाही. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. या आगीमध्ये नेमके किती रुपयांचे नुकसान झाले याचा अंदाज कळू शकला नाही.

दरम्यान, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी संजय दैने, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, उपमुख्यकार्यकारी अधिकारी अनंतकुमार कुंभार, गणेश वाघ, आत्माराम बोंद्रे यांनी नुकसानीची पाहणी केली. तर पोलिस निरीक्षक विकास पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक महादेव मांजरमकर यांच्या पथकानेही घटनास्थळी भेट दिली आहे. जिल्हा परिषदेच्या इमारतीला शॉर्ट सर्किटमुळेच आग लागल्याचे सांगितले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.