हिंगोलीच्या पालकमंत्र्यांनी घेतले पतीसह वनभोजन...

vanbhojan
vanbhojan
Updated on

हिंगोली ः राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री तथा हिंगोलीच्या पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी हिंगोली जिल्‍ह्यात दोन दिवस दौऱ्यावर आल्या होत्या. रविवारी (ता. दहा) त्‍यांच्या दौरा संपल्यावर त्या परतीच्या प्रवासात मुंबईकडे जात असताना त्‍यांनी रस्‍त्‍यात गाडी थांबवून झाडाच्या सावलीत पती राजू गोडसे यांच्यासोबत भोजनाचा आस्‍वाद घेतला.

पालकमंत्री वर्षा गायकवाड ह्या हिंगोली जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तसेच पाणीटंचाई आढावा बैठकीनिमित्ताने दोन दिवसांच्या दौऱ्यावर आल्या होत्या. या दोन दिवसांत त्‍यांनी जिल्‍हा सामान्य रुग्णालयात भेट देऊन रुग्णांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच विविध संघटनांच्या प्रतिनिधींशी संवाद साधत त्यांची निवेदने स्विकारली. 

पती राजू गोडसे यांच्यासोबत जेवणाचा आस्‍वाद 
दोन दिवस सतत धावपळ करीत त्यांनी परिस्थिती जाणून घेत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. जिल्ह्याचा आढावा घेऊन त्या रविवारी सकाळी परत मुंबईकडे निघाल्या. कामात व्यस्त असल्याने त्यांना निवांत जेवण्यासाठी वेळही मिळाला नाही. त्यामुळे प्रवासात त्यांनी एका शेतात पती राजू गोडसे यांच्यासोबत झाडाच्या सावतील भारतीय बैठकीत जेवणाचा स्‍वाद घेतला. या वेळी त्यांचा सोबत असणारे सुरक्षारक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांनीही शेतात निवांत जेवण केले आणि यानंतर सर्व जण पुढील प्रवासासाठी रवाना झाले. 

ग्रीन झोनमध्ये येण्यासाठी प्रयत्न करा
हिंगोली : कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत राज्यात सातत्याने वाढ होत आहे. परंतु, जिल्हा प्रशासनाने केलेल्या प्रभावी उपाययोजनांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचे प्रमाण नियंत्रणात राखण्यात मदत झाली आहे. मात्र, आपला जिल्हा लवकरात-लवकर ग्रीन झोनमध्ये येण्यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी शनिवारी (ता.नऊ) आढावा केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री प्रा. गायकवाड बोलत होत्या. या वेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधाविनोद शर्मा, अतिरिक्त जिल्हाधिकारी जगदीश मिणियार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांची उपस्थिती होती. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.