Dharur Fort Wall Collapsed : सात कोटी पाण्यात! बीडमधील धारूर किल्ल्याची भिंत पुन्हा ढासळली; 'हा' ऐतिहासिक ठेवा धोक्यात

Renovation Work of Dharur Fort Under Scrutiny After Frequent Collapses : धारूर शहराच्या पश्चिमेस ३७ एक्कर मध्ये पसरलेला भुईकोट किल्ला आहे. या किल्ल्याची गडकोट, भुईकोट व जलकोट अशी रचना आहे.
Dharur Fort Latest News
Dharur Fort Latest News
Updated on

जि. बीड ता.किल्लेधारूर (ईश्वर खामकर) : धारूर शहराच्या पश्चिमेस ३७ एक्कर मध्ये पसरलेला भुईकोट किल्ला आहे. या किल्ल्याची गडकोट, भुईकोट व जलकोट अशी रचना आहे. या किल्ल्याला पाहण्यासाठी राज्यभरातून पर्यटक येत असतात. किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी मागील काही वर्षाखाली सात कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता, मात्र संबंधित गुत्तेदाराने किल्ल्याचे काम निकृष्ट दर्जाचे केले परिणामी एक दोन वर्षाच्या आतच तीन भिंती कोसळल्या होत्या मात्र गुत्तेदाराची पाच वर्षांची देखभाल दुरुस्ती असल्याने व स्थानिक नागरिकांनी केलेल्या पाठ पुराव्यामुळे या भिंती बांधून दिल्या. मात्र हे संपूर्ण काम निकृष्ट झाले असल्याने आता चौथी भिंत देखील पडली आहे. ही भिंत तात्काळ बांधावी व या झालेल्या कामाची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी स्थानिक नगरिक करत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.