कांगणेवाडीच्या रणरागिणीची शाळेसाठी घोडेसवारी

उजनी असा करते प्रवास, पुन्हा जुने दिवस
रणरागिणीची शाळेसाठी घोडेसवारी
रणरागिणीची शाळेसाठी घोडेसवारी sakal
Updated on

घाटनांदूर: (संजय रानभरे) पुर्वीच्या काळात कुठलेच वाहन नसल्याने दुसर्‍या गावाला जाण्यासाठी घोड्यावर जावे लागत असे. आता पुन्हा ते जुने दिवस येतात की काम असे झाले आहे. कारण संपामुळे बस बंद असल्याने कांगणेवाडीच्या (ता.अंबाजोगाई) रणरागिणीला उजनीला शाळेत जाण्यासाठी चक्क घोड्यावर जावे लागत आहे. शाळा सुरू झाल्यापासून तिने ही घोडेसवारीच सुरू केली आहे.एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बस बंद असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्याना शाळेपासून पर्यायाने शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. परंतु कांगणेवाडी येथील माधवी कांगणे या विद्यार्थिनीने बस कधी सुरू होतील याची वाट न बघता आपल्या घरच्या घोड्यावरच शाळेचा रस्ता धरला आहे.

रणरागिणीची शाळेसाठी घोडेसवारी
‘बार्टी’ला गरज तीनशे कोटींची, मिळाला तुटपुंजा निधी : माने

घोडेसवारीचा छंद

कांगणेवाडी येथील माधवी दशरथ कांगणे हिला लहानपणापासूनच घोडेसवारिचा छंद आहे. तिच्या गावात फक्त चौथी पर्यंतच शाळा आहे. त्यामुळे तेथील सर्व विद्यार्थ्यांना पुढील माध्यमिक शिक्षणासाठी पाच किलोमीटरवर अंतरावर असलेल्या उजनी या गावी जावे लागते. कोणी बसने तर कोणी सायकलवर या शाळेत जातात. माधवी आपल्या वडिलांबरोबर दुचाकीवर तर कधी बसने उजनीच्या सिध्देश्वर विद्यालयात जात होती. यावर्षी ती सातवीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. परंतू सध्या बसही बंद आहेत, अन् पेट्रोलही महागले आहे. त्यामुळे तीने रणरागिणी सारखे धाडस करीत आपल्या घोड्यावरच शाळेत जाण्याचा निर्णय घेतला. तिच्या वडिलांनीही तिला परवानगी दिली.

वडिलांनीच दिले धडे

माधवीचे वडील दशरथ कांगणे यांना जेमतेम एक एकर जमीन आहे. शेळी पालनाचाही ते व्यवसाय करतात पूर्वीपासूनच त्यांना घोडे सांभाळण्याचा छंद आहे. त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. या दोन्ही मुलांना त्यांनी लहान वयातच घोडेसवारीचे धडे दिले आहेत. त्यामुळे माधवीला लहानपणापासून लगाम हातात धरणे, घोड्यावर बसणे याची सवय आहे. माळेगावच्या यात्रेतून त्यांनी ही घोडी आणली होती. त्यावेळी ती आठ महिन्याची होती. तीचा सर्वात जास्त सांभाळ व पालन पोषण माधवीनेच केले आहे.

रणरागिणीची शाळेसाठी घोडेसवारी
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत २१ पैकी सहा बिनविरोध

बाजुच्या शेतात बांधते घोडा

मेट्रो शहरातील मुले चित्रात किंवा व्हिडिओत घोडे पाहत असतात. काही जणांना रेसकोर्सवर गेल्यावरही बघायला मिळतो, परंतू उजनीच्या मुलांना माधवीने आणलेला घोडा रोज बघायला मिळतो. शाळेत येण्यापूर्वी ती आपल्या घोड्याला शाळेच्या शेजारीच असलेल्या शेतातील गोठ्यात बांधते, त्यानंतर शाळेत प्रवेश करते. मात्र माधवीच्या या धाडसाचे सर्वजण कौतुक करतात. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक महिने शाळा बंद होत्या. ऑनलाईन शिक्षण सुरू होते परंतु ग्रामीण भागात इंटरनेटच्या कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम असल्याने ग्रामीण विद्यार्थ्याचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. दीड वर्षानंतर शाळा सुरू झाल्याने आता तरी शाळेत जाता येईल, असे वाटले होते. परंतू एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू झाल्याने बाहेर गावी शिक्षणास जाणाऱ्या विध्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ लागले.

माधवीला लहानपणा पासूनच घोडेसवारीची सवय आहे. शिक्षणाचीही तिला आवड आहे. परंतू बस बंद असल्याने शाळेत जाण्याचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे तिच्या शिक्षणात अडचणी येऊ नयेत म्हणून घोड्यावर शाळेत जाण्याची परवानगी दिल्याचे दशरथ कांगणे यांनी सांगितलेमाधवीच्या वडिलांची संमती असल्याने, बसही बंद आहेत, अखेर त्यांच्या (पालकांच्या) जबाबदारीवर तिला शाळेत येण्यास परवानगी दिल्याचे शाळेचे मुख्याध्यापक डी. एस. बंडगर यांनी सांगितले.

शाळेची ओढ

कोरोनामुळे बरेच दिवस झाले शाळा बंद आहेत. शाळा काधी सुरू होतात, अन् कधी एकदाची शाळेत जाते याची ओढ लागली होती. परंतू पुन्हा बस बंद, त्यामुळेच आपल्या घोड्यावर शाळेत जाण्याचा निर्णय मी घेतला असे माधवीने सांगितले.माधवीच्या या धाडसाचे शिक्षणाधिकारी चंदन कुलकर्णी, शाळेचे पर्यवेक्षक आर. एन. लोमटे, शिक्षक लालासाहेब गायकवाड आदींनी कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.