Success Story : हॉटेलमधील कामगार झाले मालक; चहाच्या व्यवसायातून महिन्याकाठी लाखाची उलाढाल

Tea Business : हॉटेलमध्ये कामगार म्हणून काम केलेल्या दोन जीवलग मित्रांनी चहाचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि चहाचे हॉटेल सुरू केले.
hotel worker becomes owner turnover of lakhs per month from tea business
hotel worker becomes owner turnover of lakhs per month from tea business Sakal
Updated on

- धनंजय शेटे

भूम : हॉटेलमध्ये कामगार म्हणून काम केलेल्या दोन जीवलग मित्रांनी चहाचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि चहाचे हॉटेल सुरू केले. महिन्याकाठी एक लाख रुपयांची उलाढाल सध्या होत असून, या दोन मित्रांच्या आयुष्यात चहाच्या व्यवसायाने गोडवा आणला आहे. कामगार ते मालक हा त्यांचा प्रवास इतरांसाठी प्रेरणादायी आहे.

ईट (ता. भूम, जि. धाराशिव) येथील दोन जीवलग मित्र अशोक चव्हाण आणि दयानंद गायकवाड हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत होते. दयानंद गायकवाड यांनी १५ वर्षे, तर अशोक चव्हाण यांनी दहा वर्षे हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम केले.

अखेर दोन्ही मित्रांनी स्वतःचा व्यवसाय करण्याचे ठरविले. आधी शंभर रुपयांपासून कामाला सुरवात केली. आता स्वतःचा चहाचा व्यवसाय सुरू केला आणि त्यातून त्यांना चांगले आर्थिक उत्पन्न मिळत आहे.

दोन वर्षांपूर्वी या दोन मित्रांनी कसेबसे २५ हजार रुपये जमा केले आणि चहाचे हॉटेल सुरू केले. आज दिवसाकाठी तीन ते चार हजार रुपयांची, तर महिन्याकाठी एक लाख रुपयांची उलाढाल होत आहे. त्यांना दिवसाकाठी चहासाठी शंभर लिटर दुधाची गरज भासते आहे.

कष्ट करण्याची जिद्द आणि चिकाटी असली, की चांगले आर्थिक उत्पन्न मिळविता येते. हॉटेल सुरू करण्यासाठी एकट्याची आर्थिक ताकद नव्हती, म्हणून दोघांनी मिळून हॉटेलचा व्यवसाय सुरू केला आणि आज चांगले आर्थिक उत्पन्न मिळत आहे. दोन मित्रांनी एकत्र येऊन सुरू केलेला हा व्यवसाय अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.

लोकांच्या हॉटेलमध्ये केलेल्या कामाचा मोबदला कामाप्रमाणे भेटत नव्हता. वर्षानुवर्षे काम करत राहिलो. शेवटी आपण काहीतरी काम करावे. मित्राला भागीदारीमध्ये घेऊन चहाचे हॉटेल सुरू केले. भांडवल नव्हते. दोघांनी मिळून २५ हजार रुपये जमा केले व हळूहळू चहाचा व्यवसाय वाढत गेला. आता महिन्यासाठी एक लाख रुपयांची उलाढाल होत आहे.

— अशोक चव्हाण, हॉटेल व्यावसायिक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.