‘तुला बुरगुंडा होऊ दे...’; होट्टल महोत्सव

deglur 3.jpg
deglur 3.jpg
Updated on


देगलूर, (जि. नांदेड) ः महाराष्ट्र चित्रपट महासंघाचा महाराष्ट्रभूषण पुरस्कार प्राप्त प्रख्यात भारूडकार व ज्या भारूडाने अमेरिकेतील शिकागो येथील प्रेक्षकांनाही भुरळ पडली ‘तुला बुरगुंडा होऊ दे’ या अप्रतिम कलाविष्काराने प्रख्यात भारूडकर निरंजन भाकरे यांनीही होट्टल महोत्सवातील रसिकांवर रविवारी (ता. १९) भुरळ पाडून आपल्या या कलेला दाद मिळविली. तीन दिवस सुरू असलेला होट्टल महोत्सवाची रविवारी सांगता झाली. रविवारी झालेल्या पहिल्या सत्रात संजय जोशी व त्यांच्या संस्थाने गीतरामायणातून ‘दशरथ आहे घे पाय सदा स्वयंवर झाले सीतेचे जय गंगे जय भागीरथी’ यासह अनेक गाण्यांचे सादरीकरण करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

समाज जागृतीचा भारूड कार्यक्रम
दुसऱ्या सत्रात ‘प्राईड ऑफ इंडिया सिंगापूर’ प्राप्त अरुंधती पटवर्धन पुणे यांची शिष्या नांदेडस्थित ईशा राजीव जैन या विद्यार्थिनीने शास्त्रीय नृत्य कलेचे प्रत्येक नाट्य प्रकार सादर करून रसिकांची मने जिंकली. त्यानंतर विजय जोशी यांचा लोकसंगीताचा कार्यक्रम झाला. या वेळी ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीताने रसिक डुलले, निरंजन भाकरे यांनी सोंगी भारूड कलापथकाद्वारे पाणलोट व्यवस्थापन व स्त्री भ्रूणहत्या, अंधश्रद्धा निर्मूलन, महिला सबलीकरण, पाणंदमुक्ती, पर्यावरण संरक्षण, बचत गट, राष्ट्रीय एकात्मता अशा समाज जागृतीचा प्रबोधनात्मक भारूडांतून कार्यक्रमाद्वारे रसिकांवर मोहिनी टाकली. शेवटी ज्या ‘तुला बुरगुंडा होऊ दे...’ या भारूडाने त्यांनी अमेरिकेतील शिकागो शहरात सादर केलेल्या या सादरीकरणाला तेथील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले, तो कार्यक्रम सादर करून समाजातील चाली किती अस्पृश्यता, अंधश्रद्धा यावर प्रकाश टाकला. दोन तास प्रेक्षकांना खिळवून ठेवले, त्यात भारूडाने होट्टल महोत्सवाची सांगता करण्यात आली.

प्रारंभी रविवारी झालेल्या कार्यक्रमाचे उद्‍घाटन आमदार रावसाहेब अंतापूरकर यांनी केले. या वेळी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंग परदेशी, जिल्हा परिषद सदस्य रामराव नाईक, पंचायत समिती सदस्य राजाराम कांबळे, रमेश शिवणीकर, सभापती संजय वलकले यांची उपस्थिती होती. तीन दिवस चाललेल्या या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेणारे अधिकारी कर्मचारी प्रसारमाध्यमातील घटकांचा जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी जिल्हा पोलिस अधिकारी तथा कार्यक्रमाचे समन्वयक निळकंठ पाचंगे व सरपंच शेषराव सूर्यवंशी यांचाही जिल्हाधिकाऱ्यांनी सन्मानपूर्वक सत्कार केला.

कार्यक्रमाच्या शेवटी होट्टल ग्रामपंचायतीच्या वतीने जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, खुशालसिंग परदेशी, उपजिल्हाधिकारी शक्ती कदम, यांचा सपत्नीक सत्कार सरपंच शेषराव सूर्यवंशी यांनी केले, तर तहसीलदार अरविंद बोळगे, नायब तहसीलदार वसंत नरवाडे, तहसीलदार मकरंद दिवाकर, माजी शिक्षण संचालक गोविंद नांदेडे, माजी सीईओ शिवाजी कपाळे यांच्यासह कर्मचाऱ्यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक राजेश कुलकर्णी यांनी करून उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाला हदगावचे तहसीलदार जीवराज डापकर यांच्यासह अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.