नांदेड : शहर वाहतुकीच्या नियोजनासाठी कायमस्वरूपी सुधारणा उपाय योजना करणे आवश्यक आहे. यासाठी तज्ञ समिती नेमून याबाबतचा आराखडा करावा लागेल. याकरिता मोठी आर्थिक तरतूद लागेल. नांदेड शहरातील रस्त्यांच्या परिस्थितीचा अभ्यास केल्यास काही उणिवा व मार्ग सापडतील. त्यासाठी राजकिय इच्छाशक्ती असणे आवश्यक आहे.
खालील उपाय योजना आवश्यक आहेत :
प्रत्येक चौकापासून चारही बाजूला पन्नास मीटरपर्यंत पार्किंगकरिता असलेल्या जागेत बदल करून ती जागा मुख्य रस्त्यात सामील करणे. शहरात वाढलेल्या वाहनांची संख्या लक्षात घेता रस्त्याच्या रचनेमध्ये किंचित बदल करून सिग्नलवरून डावीकडील भागाकडे जाणारी वाहतूक व्यवस्था सलग सुरू करण्याकरिता प्रत्येक चौकातील लेफ्ट टर्न सतत सुरू ठेवणे आवश्यक आहे.
प्रत्येक चौकापासून चारही बाजूला 50 मीटरपर्यंत पार्किंगकरिता असलेल्या जागेत बदल करुन ती जागा मुख्य रस्त्यात सामील केल्यास चौकातील वाहतूक कोंडी बंद होण्यास मदत होईल. तसेच नागरिकांना लेन पाळण्याची सवय लावून घेता येईल. ॲम्बुलन्स इत्यादी अत्यावश्यक सेवाची वाहने सहजपणे चौकातून निघून जाण्यास मदत होईल.
नवीन सिग्नल सुरु करणे :
शहरांमध्ये आज रोजीची सिग्नल व्यवस्था सन 2008 ला झालेली आहे. आता शहराचे झालेले विस्तारीकरण पाहता अनेक नवीन वर्दळीचे चौक तयार झालेले आहेत.
सध्या खालील ठिकाणी नवीन सिग्नल व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे.
ँ नमस्कार चौक, महाराणा प्रताप चौक, नाईक चौक, भाग्यनगर टी पॉईन्ट, डॉ. शंकराव चव्हाण पुतळा टी पॉईंट, चैतन्यनगर, भावसार चौक, कॅनॉल रोड तरोडा नाका याच्यापुढील चौक, छत्रपती चौक, पंचशील ड्रेसेस जवळ, व्हीआयपी रेस्ट हाऊस पी पॉईंट, कुसुमताई चौक, तिरंगा चौक, गुरुद्वारा गेट नंबर एक, देना बँक चौक, हिंगोली रेल्वे गेट, कविता रेस्टॉरंट, बरकत कॉम्प्लेक्स, हबीब टॉकीज, बर्की चौक दूध डेअरी चौक, वाल्मिकी चौक, चंद्रसिंग कॉर्नर, ढवळे कॉर्नर, असर्जन आणि धनेगाव.
वाहतुकीचे पर्याय मार्ग दुरुस्त करणे :
सण-उत्सव, मोर्चे, मिरवणुका, जयंती इत्यादी वेळी पर्यायी मार्ग म्हणून उपयोग करता येईल.
हे मार्ग दुरुस्त केल्यास नागरिकांसाठी अधिक सोयीस्कर ठरेल. यात व्हीआयपी रोडवरील गंगा पेट्रोल पंप ते सरळ पुढे शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या मागून गोकुळनगरपर्यंत व या भागातील सर्व रस्ते. कुसुमताई चौक ते ज्योती टॉकीज जाणार रस्ता, अलीभाई टॉवर जवळून ब्रिज सुरू होताना डावीकडे ते गोकुळनगर रेल्वे स्टेशन चौक ते पुढे अण्णाभाऊ साठे पुतळाकडे जाणारा रस्ता. पंचशील ड्रेसेस श्रीनगर ते मुख्य रस्त्याच्या मागून समांतर निजाम कॉलनीकडे ते शनी मंदिर- तरोडा नाका शेतकरी चौकापर्यंत. व्हीआयपी रेस्ट हाऊस ते महात्मा फुले हायस्कूल बाबानगर. ब्रिजपासून डाव्या बाजूला जाणारा रस्ता. डॉक्टर बन्नाळीकर हॉस्पिटलच्या समोरून बसस्थानकाकडे व रेल्वे स्टेशनकडे. एसटी ओव्हर ब्रिजपासून मिल गेटकडे, तिरंगा चौक, लालवाडी, आंबेडकरनगर गणेशनगर, सार्वजनिक बांधकाम विभाग रेस्ट हाऊस ते आनंदनगरकडे जाणारा रस्ता.
वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी येथे उड्डाणपूलाची गरज :
उड्डाणपुलाचे ठिकाण गोकुळनगर रेल्वेस्टेशनकडे जाणारा रोड ते रेल्वेस्टेशनवरून जिल्हा परिषदपर्यंत. याचा परिणाम असा की यामुळे आयटीआय ते वजीराबादपर्यंतचा मुख्य रस्त्यावरील ताण कमी होईल व श्रीनगर आयटीआयकडून जुन्या शहरात जाण्यास पर्यायी मार्ग उपलब्ध होईल. अनुराधा पॅलेस ते वाजेगाव पुलापर्यंत यामुळे देगलूर नाका मार्गे शहरात बाहेर जाणाऱ्या वाहनांचा देगलूर नाका येथे होणारा ताण कमी होईल.
इ- चलन फेज दोन सुरू करणे :
सध्या सुरू असलेली चलन पद्धत मॅन्युअली आहे. यासाठी बेशिस्त वाहनधारकांची गाडी थांबवावी लागते. किंवा पुरावे कामे किमान त्या वाहनाचा नंबर फोटोमध्ये घेणे आवश्यक आहे. पुढील टप्प्यात मुंबई, पुणे, नागपूरच्या धर्तीवर प्रत्येक चौकातील सिग्नलवर हाय-डेफिनेशन कॅमेराद्वारे ही चलन पद्धत सुरू केल्यास बेसिस्त वाहनधारकांवर वचक बसेल आणि वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल.
त्याचे फायदे खालील प्रमाणे :
सिग्नल जम्प करणाऱ्यावर आपोआप कारवाई होते. वाहतुकीचे नियम मोडणारे जसे की ट्रिपल सीट, फॅन्सी नंबर प्लेट, विना हेल्मेट, लेन कटिंग करणारे, झेब्रा क्रॉसिंग करणारे, मोबाईलवर बोलणारे वाहनधारक यांच्यावर नियंत्रण कक्षात बसून कार्यवाही करता येते. गुन्हे नियंत्रण आणि गुन्हे शोध करिता हाय-डेफिनेशन कॅमेऱ्याची प्रभावी मदत होऊ शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.