Beed News : रस्त्यासाठी शेकडो विद्यार्थी रस्त्यावर; धानोरा रोडच्या दुरुस्तीची मागणी, घोषणांनी दणाणला परिसर

विद्यार्थी मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरासमोर पोचले. आंदोलनात सामाजिक कार्यकर्त्यांसह शेकडो विद्यार्थी सहभागी झाले.
hundreds of students on street for dhanora road transport traffic beed
hundreds of students on street for dhanora road transport traffic beedsakal
Updated on

Beed News : ‘रस्ता करा, रस्ता करा, धानोरा रस्ता लवकर करा’, अशा घोषणांनी बुधवारी (ता. ३१) जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला. तत्पूर्वी विद्यार्थी मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरासमोर पोचले. आंदोलनात सामाजिक कार्यकर्त्यांसह शेकडो विद्यार्थी सहभागी झाले.

नगर रोड ते धानोरा रोडची दुरवस्था झाली आहे. यामुळे नागरिकांसह वाहनचालकांना मोठा त्रास होतो. याच रस्त्यावर काही मराठी व काही इंग्रजी माध्यमांच्याही शाळा आहेत. रस्त्यावरील मोठ - मोठ्या खड्ड्यांमुळे रिक्षातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. या रस्त्यावरून दळणवळण कठीण झाल्याने या रस्त्यावरील व्यापारपेठही उदास झाली आहे.

hundreds of students on street for dhanora road transport traffic beed
Beed : एका क्लिकवर आता ५३,३५९ आरोपींची कुंडली; ‘सीसीटीएनस’मध्ये पुन्हा बीड अग्रेसर

रस्ता बांधणीकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप करत आंदोलन करण्यात आले. या मागणीसाठी नीतेश उपाध्ये उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बुधवारी या रस्त्यावरील शाळांतील विद्यार्थीही मोर्चा काढून सहभागी झाले. आंदोलक विद्यार्थ्यांच्या घोषणांमुळे नगर रोड परिसर व जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला.

hundreds of students on street for dhanora road transport traffic beed
Beed Crime : दीड महिन्याच्या बाळाला जमिनीवर आपटून मारहाण! 11 जणांवर जीवघेणा हल्ला; दरोड्याच्या घटनेने हादरला बीड जिल्हा

बांधकाम विभागाला निर्देश

आंदोलनासाठी माजी नगरसेवक रणजित बनसोडे, भय्या मोरे यांनी पुढाकार घेतला. आंदोलनाच्या ठिकाणी शिवसेना (ठाकरे गट) जिल्हाप्रमुख गणेश वरेकर, तालुकाप्रमुख गोरख सिंघन, श्रीकृष्ण गायके, सतीष क्षीरसागर, संभाजी सुर्वे, रमेश नवले,

रत्नाकर येवले आदींनीही पाठिंबा दिला. निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी आंदोलनस्थळी येऊन निवेदन स्वीकारले. मागणीबाबत बांधकाम विभागाला आवश्‍यक कार्यवाहीचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांमार्फत देण्याचे आश्‍वासन स्वामी यांनी दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.