सुखी संसाराचा शेवट,एकाच दोरीने गळफास घेऊन पती-पत्नीची आत्महत्या

तीन वर्षांपूर्वीच रामदास यांचा विवाह विदर्भातील मडी या गावातील शीतल यांच्या सोबत झाला होता.
Suicide
SuicideSuicide
Updated on

सेनगाव (जि.हिंगोली) : तालुक्यातील दाताडा बुद्रुक शिवारात लिंबाच्या झाडाला एकाच दोरीने पती-पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (ता.तीन) सकाळी आठ वाजता उघडकीस आली आहे. याबाबत नातेवाईक व पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव (Sengaon) तालुक्यातील वाघजाळी येथील मूळचे रहिवासी असलेले रामदास इंगळे यांनी काही वर्षांपूर्वी दाताडा बुद्रुक शिवारात बटाईने शेत जमीन (Hingoli Crime) घेतली होेती. त्यामुळे ते शेतातील आखाड्यावरच राहात होते. तीन वर्षांपूर्वीच रामदास यांचा विवाह विदर्भातील (Vidarbha) मडी या गावातील शीतल यांच्या सोबत झाला होता. तर सहा महिन्यांपूर्वीच रामदास यांचे वडील बाळू इंगळे यांचे निधन झाले होते. दरम्यान, तीन महिन्यांपूर्वी शीतल इंगळे या माहेरी मडी या गावी गेल्या होत्या. (Husband And Wife Hanged Themselves In Sengaon Taluka Of Hingoli)

Suicide
Hingoli : सोलापूरला जाणाऱ्या खासगी बसचा भीषण अपघात, १२ प्रवासी जखमी

त्यामुळे शेतातील आखाड्यावर रामदास इंगळे व त्यांची आई सरस्वतीबाई इंगळे हे दोघेच राहात होते. दोन दिवसांपूर्वी रामदास देखील मडी येथे गेले होते. त्यानंतर ते आखाड्यावर आलेच नाहीत. सोमवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास काही शेतकरी दाताडा बुद्रुक शिवारातून जात असताना एका झाडाला दोन मृतदेह लटकल्याचे दिसून आले. त्यांनी हा प्रकार गावात कळविल्यानंतर गावकरी घटनास्थळी आले. तसेच सेनगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रणजीत भोईटे, उपनिरीक्षक अच्युत मुपडे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.

Suicide
धक्कादायक! मासे पकडण्यासाठी लावलेल्या जाळ्यात तब्बल 50 सापांचा मृत्यू

त्यानंतर वाघजाळी येथील काही गावकऱ्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता सदर मृतदेह रामदास इंगळे (वय २४) व त्यांची पत्नी शितल इंगळे (वय २२) यांचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अजून समजू शकले नाही. पुढील तपास सेनगाव पोलीस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.