Crime News : थेरगावजवळ मालवाहू ट्रकने पतीस चिरडले; पत्नी गंभीर जखमी

पत्नी अश्विनी शरणागत ही गंभीर जखमी झाली
Crime News
Crime Newsesakal
Updated on

पाचोड : भरधाव वेगातील मालवाहू ट्रकने समोरून येणाऱ्या दुचाकीवरील दोघांस चिरडल्याने एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना पाचोड - पैठण रस्त्यावर थेरगाव (ता.पैठण) जवळ शुक्रवारी (ता.२१) दुपारी सव्वादोन वाजेच्या सुमारास घडली.

Crime News
Akole News : सरकारी रुग्णालयात शुकशुकाट रुग्ण शहराच्या दिशेने

यासंबंधी अधिक माहिती अशी, बालानगर (ता.पैठण) येथील विकास बाबासाहेब शरणागत (वय २५ वर्षे) व अश्विनी विकास शरणागत (वय २० वर्षे) हे पती - पत्नी पैठणकडून आपल्या दुचाकी (क्र.एम एच २० डि आर ०८६८) ने पाचोड येथे वैद्यकिय तपासणीसाठी येत असतांना समोरून भरधाव वेगात येणाऱ्या मालवाहु ट्रक (क्र.एम एच ४६ एफ ५९७४)ने दुचाकीस जोराची धडक दिली. यांत सदर दुचाकी ट्रकच्या चाकात अडकून शंभर फुटांपर्यंत फरपटत गेली.यांत विकास शरणागत हा चाकाखाली आल्याने त्याच्या कंबरेखालील भागाचे चार तुकडे होऊन पूर्णतः चेंदामेंदा झाला; तर त्याची पत्नी अश्विनी शरणागत ही गंभीर जखमी झाली.

Crime News
Nashik Crime News : शासकीय वाळू डेपोत टोळक्याचा धुमाकूळ; एकाला अटक

अपघातानंतर वाहनचालकाने वाहन न थांबवता घटनास्थळाहून पळ काढला. मात्र यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य विलास भुमरे हे पैठणकडे जात होते. त्यांनी हा अपघात पाहून पसार होणाऱ्या अपघातग्रस्त ट्रकचा पाठलाग करून दावरवाडी (ता.पैठण) फाट्याजवळ हा ट्रक थांबवून पाचोड पोलिसांना त्याची माहिती दिली.ही माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक शरदचंद्र रोडगे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गोविंद राऊत, विलास काकडे,गणेश रोकडे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन सदर ट्रक चालकास ताब्यात घेतले व रुग्णवाहिकेस पाचारण करून त्याद्वारे जखमी व मृतास पाचोडच्या ग्रामीण रुणालयात दाखल केले. वैद्यकिय अधिकारी डॉ.बाबासाहेब घुगे यांनी विकास शरणागत यांस तपासून मृत घोषित केले तर अश्विनी शरणागत यांवर प्रथमोपचार करून त्यांस छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात पाठवले.

मयत विकास शरणागत याचा चुलत भाऊ राजेंद्र शरणागत याच्या तक्रारीवरून ट्रक चालक गणेश उर्फ सुरेश पोपट सुळ रा. दगडवाडी निर्वागी (ता. इंदापूर जि.पुणे) याचे विरुद्ध आपल्या ताब्यातील वाहन निष्काळजीपणे चालवून संबंधीताच्या मरणास कारणीभूत ठरल्याच्या कलमाखाली गुन्हा दाखल करून त्यास गजाआड केले. या अपघातात दुचाकीचा पूर्णतः चुराडा होऊन रस्त्यावर रक्तमांसाचा सडा पडला होता. या घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गोविंद राऊत करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.