पत्नीचा खुन केल्याप्रकरणी पतीला जन्मठेप

माडज येथे झाली होती घटना
Court
CourtSAKAL
Updated on

उमरगा (जि. उस्मानाबाद) - मुलाच्या शिक्षणासाठी शेतजमिन लिहुन देण्यास पत्नीच्या होणाऱ्या विरोधामुळे तालुक्यातील माडज येथे पतीने पत्नीचा गळा दाबून खून केल्याप्रकरणी शनिवारी (ता. सहा) येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने पतीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

याबाबत माहिती अशी की, माडज येथील पूर्नवसीत गावातील मोहनसिंग महाबीरसिंग गहेरवार (वय ४८) भिगवणला एमआयडीसीमध्ये कामाला होता. मुलीचे घटनेच्या दिड वर्षापूर्वी लग्न झाले होते. मुलगा शुभमचे बारावीचे शिक्षण उमरग्यात झाले होते, पुढील शिक्षण हैद्राबादला मुलाच्या आत्याकडे करायचे होते. परंतु शिक्षणाच्या खर्चासाठी बहिणीला शेतजमिन लिहुन देण्याचा मोहनसिंगचा आग्रह होता. मात्र पत्नी अनुसयाचा त्याला विरोध होता. त्यामुळे मोहनसिंग व अनुसया पती - पत्नीत नेहमी खटके उडायचे. माहेरवरून पैसे आण म्हणून शारिरिक व मानसिक छळही सुरू होता.

अनुसयाचा भाऊ मोहनसिंग युवराजसिंग दिक्षीत रा. आलुर यांनी आरोपी मोहनसिंग यास दुचाकी व मळणीयंत्र घेण्यासाठी पैसे दिले होते. शुभमच्या शिक्षणासाठी सुरू असलेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी अनुसयाचा भाऊ मोहनसिंग यांनी मध्यस्थी केली. भाच्चा शिवम व बहिण यांना स्वतःच्या खर्चातुन औरंगाबादला बी.सी.ए. शिक्षणासाठी ठेवले होते. परंतु मोहनसिंगला ही बाब पसंद नव्हती. त्यामुळे त्याने पत्नी अनुसयाला माडजला बोलावून घेतले होते. एक ऑक्टोबर २०१८ रोजी रात्री मोहनसिंगने अनुसयाचा गळा दाबून खून केला. पहाटेच्या सुमारास अंथरुणावर ही घटना उघडकिस आली होती.

अनुसयाचा भाऊ मोहनसिंग दिक्षीत यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी शासनातर्फे एकुण १६ साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी डॉ. सुनंदा सुर्यवंशी, प्रदिपसिंग गहेरवार, आरोपीचा व मयत अनुसयाचा मुलगा शिवम, मिना मदनसिंग दिक्षीत, तपास करणारे तत्कालिन पोलिस उपनिरीक्षक विजयकुमार वाघ यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या.

न्यायालयासमोर आलेला पुरावा तसेच अतिरिक्त शासकीय अभियोक्ता अँड. श्रीमती सुषमा घोडके यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायधिश डी. के. अनभुले यांनी आरोपी मोहनसिंग महावीरसिंग गहेरवार रा. माडज यास जन्मठेप व आठ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. माहेरहुन रक्कम घेऊन येण्याच्या मागणीसाठी शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी दोन वर्ष शिक्षा न्यायालयाने सुनावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.