जनते पुढे राजकारणी हारले! आंचल गोयल या जिल्हाधिकारीपदी रुजू

जिल्हाधिकारी आंचल गोयल
जिल्हाधिकारी आंचल गोयलसकाळ
Updated on

परभणी : आयएएस अधिकारी आंचल गोयल (IAS Aanchal Goyal) यांनाच परभणीच्या जिल्हाधिकारीपदी (Parbhani District Collector) नेमावे या आग्रही मागणीसाठी छेडलेल्या जनआंदोलनाचा अखेर विजय मिळाला आहे. आंचल गोयल यांनी मंगळवारी (ता.तीन) परभणीच्या जिल्हाधिकारीपदाचा पदभार स्विकारला. परभणी जिल्हाधिकारीपदी आंचल गोयल यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानुसार श्रीमती गोयल या पदभार घेण्यासाठी परभणीत आल्या देखील होत्या. परंतू स्थानिक राजकीय दबावातून त्यांना पदभार घेण्यापासून दूर ठेवण्यात आले. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर हे सेवानिवृत्त झाल्याने त्यांनी त्यांचा पदभार अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश काटकर यांच्याकडे द्यावा, असे आदेश सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने काढण्यात आल्याने श्रीमती गोयल यांना परतावे लागले होते. परंतू, या प्रकरणी परभणीकरांनी (Parbhani) सोमवारी (ता.दोन) निदर्शने करून शासनावर दबाव वाढविला होता. अखेर परभणीकरांचे जनआंदोलनाचा विजय झाला आहे. आंचल गोयल यांनी परभणीच्या जिल्हाधिकारी पदाचा पदभार मंगळवारी सायंकाळी स्वीकारला.

जिल्हाधिकारी आंचल गोयल
वैद्यकीय अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी निधन

विभागीय आयुक्तांना पत्र

जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी मंगळवारी (ता.तीन) दुपारी साडेचार ते पाचच्या दरम्यान परभणीच्या जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्विकारला. त्यांनी त्या संदर्भातील पत्र औरंगाबाद विभागाचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना पाठविले आहे. या संदर्भात विभागीय आयुक्त श्री. केंद्रेकर यांनी आपल्याला पत्र मिळाले असल्याचे सकाळशी बोलतांना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.