IAS Pooja Khedkar
IAS Pooja Khedkar

IAS Pooja Khedkar: पूजा खेडकरच्या वडिलांनी पंकजा मुंडेंसाठी घातलं होतं साकडं, कोण आहेत दिलीप खेडकर ?

Pooja Khedkar Father vow for bjp leader pankaja munde: परिविक्षाधीन आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या संदर्भात अनेक नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. पूजा खेडकर यांचे वडील निवृत्त प्रशासकीय अधिकारी आहेत.
Published on

मुंबई- परिविक्षाधीन आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या संदर्भात अनेक नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. पूजा खेडकर यांचे वडील निवृत्त प्रशासकीय अधिकारी आहेत. त्यांनी निवृत्त झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीकडून २०२४ ची अहमदनगरची लोकसभा निवडणूक लढवली होती. त्याआधी ते भाजपमध्ये सक्रीय होते. त्यांचे बंधू माणिक खेडकर हे पाच वर्षे भाजपचे तालुकाध्यक्ष राहिले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर आणि त्यांचे बंधु माणिक खेडकर यांना भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना लोकसभा किंवा राज्यसभेची उमेदवारी मिळावे असं वाटत होतं. त्यामुळेच त्यांनी मोहटादेवीला साकडे घातले होते. पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळाली तर देवीला दीड किलो वजनाचा चांदीचा मुकुट अर्पण करू असं ते म्हणाले होते. पंकजा यांना भाजपकडून लोकसभेची उमेदवारी मिळाली, तेव्हा त्यांनी आपलं साकडं पूर्ण केलं होतं.

IAS Pooja Khedkar
IAS Pooja Khedkar: पूजा खेडकर यांचे वडील आहेत कोट्यधीश; वंचितकडून लढवली होती लोकसभा निवडणूक

दिलीप खेडकर यांच्या पत्नी डॉ. मनोरमा खेडकर या भालगावच्या माजी सरपंच आहेत. त्यांचे वडील देखील प्रशासकीय अधिकारी होते. भालगावमधून भाजप उमेदवार सुजय विखे यांना काही स्थानिकांनी विरोध केला होता. गावातूनच खासदाराला विरोध झाला असल्याने माणिक खेडकर यांचे तालुकाध्यपद काढून घेतले गेले अशी चर्चा होती. विखे आणि खेडकर यांच्यात वाद निर्माण झाला होता. त्यामुळेच दिलीप खेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता.

IAS Pooja Khedkar
Pooja Khedkar : वादग्रस्त IAS पूजा खेडकर वाशिममध्ये रुजू; आरोपांवर एका वाक्यात दिली प्रतिक्रिया

दिलीप खेडकर यांनी उमेदवारी अर्ज भरताना आपली संपत्ती ४० कोटी असल्याचं सांगितलं आहे. त्यांचे वार्षिक उत्पन्न ४९ लाख आहे. सरकारी अधिकारी असताना त्यांची कोट्यवधींची संपत्ती कशी जमवली अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. खेडकर कुटुंबियांकडे जवळपास १०० एकर जमीन असल्याची माहिती आहे. पूजा खेडकर यांच्यामुळे खेडकर कुटुंबीय पुन्हा चर्चेत आलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.