गेवराई : पत्र्याच्या शेडमध्ये चालणाऱ्या कुंटणखान्यावर छापा टाकत पोलिसांनी पाच महिलांची सुटका केली. तर, एका एजंटासह आंटीला ताब्यात घेतले. ही कारवाई बुधवारी (ता.३१) सायंकाळी तालुक्यातील पाडळसिंगी येथील टोलनाक्याजवळील गेवराई पोलिसांनी केली.
सुंदर ज्ञानोबा भिसे (वय ४०, रा. बीड) व राधाबाई लोखंडे (६०, रा. धारूर) असे संशयित आरोपींची नावे आहेत. हे दोघेही एकमेकांच्या ओळखीचे असून, परजिल्ह्यातील महिलांना बीडमध्ये आणून त्यांच्याकडून पाडळसिंगी या ठिकाणी वेश्या व्यवसाय करून घेत होते. याबाबत माहिती मिळताच गेवराईचे पोलिस निरीक्षक प्रवीणकुमार बांगर यांनी बुधवारी सायंकाळी डमी ग्राहक पाठवून पर्दाफाश केला.
यावेळी सातारा, इचलकरंजी, अमरावती, पुणे येथील पाच महिलांची सुटका करून घटनास्थळावरून पोलिसांनी काही साहित्यही जप्त केले. ही कारवाई पोलिस निरीक्षक प्रवीणकुमार बांगर, सहायक निरीक्षक संतोष जवंजाळ, संजय राठोड, राजू भिसे, रेणुका बहिरवाळ, संजय सोनवणे आदींनी केली. याप्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात सुंदर ज्ञानोबा भिसे, राधाबाई लोखंडे यांच्यासह संबंधित शेतमालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.