सुशिक्षित बेरोजगारांना फसवणारा जेरबंद

फोटो
फोटो
Updated on

बिलोली ( जिल्हा नांदेड) :  रेल्वे विभागात विविध पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून बेरोजगारांची लुबाडणूक करणाऱ्या मुख्य आरोपीस यवतमाळ जिल्ह्यातील वनी या ठिकाणी अटक करण्यात आली. बिलोली पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असता दहा कोटीपेक्षा अधिक रुपयांची उलाढाल झाल्याची चर्चा असून आरोपीच्या मालमत्ता चौकशीसाठी बिलोली येथील पोलिसांचे पथक सोमवारी रवाना झाले आहे. या प्रकरणाशी संबंधित असलेल्या अनेक मध्यस्थांचे धाबे दणाणले असून त्यांच्यात संशयकल्लोळ निर्माण झाला आहे.

उच्च शिक्षीत भामटा पोलिसांच्या जाळ्यात 


हैदराबाद येथील मोहम्मद हमीद सॉफ्टवेअर अँड सर्व्हिस सेंटरच्या नावाखाली नांदेड जिल्ह्यातील गरजू सुशिक्षित युवकांना गाठून २०११ व २०१२ मध्ये रेल्वे विभागासह शिक्षण विभागात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविण्यात आले. सुशिक्षित युवकांनी नोकरीच्या आमिषाला बळी पडून सावकारी कर्ज काढून तर काहींनी शेती विकून तसेच अव्वाच्या सव्वा दराने शेती गहाण ठेवून दलालांच्या मार्फत पैसे देऊ केले. मात्र या युवकांना नोकरी लागलीच नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यातील काही युवकांनी बिलोली पोलिस ठाण्यासह नांदेड जिल्ह्यातील अन्य ठिकाणीही तक्रार दाखल केली तर काहींनी या मध्यस्थांच्या मार्फत पैसे दिले त्यांना धारेवर धरले. २०१४ व २०१५ मध्ये याप्रकरणी बिलोली पोलिस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल झाला. बिलोली तालुक्यातील तोरणा येथील मधुकर गंगाराम हिवराळे यांच्याकडून रेल्वे खात्यात लिपिक पदावर नोकरी लावण्याच्या नावाखाली ऐंशी हजार रूपये देण्यात आले होते.

आरोपीला पोलिस कोठडी


या प्रकरणातील मुख्य आरोपी मोहम्मद हमीद अफजल अहमद याने मुखेड तालुक्यातील शिवाजी राठोड यांच्या मध्थस्थीने हे पैसे घेतले होते. फिर्यादी हिवराळे यांच्या तक्रारीनुसार २०१५ मध्ये बिलोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. महम्मद हमीद यांच्या पत्नीस तत्कालीन पोलिस निरीक्षक गुणवंत मोरे यांनी ताब्यात घेतले होते. मात्र यातील मुख्य आरोपी फरार झाले. शनिवारी (ता.सात) डिसेंबर रोजी यवतमाळ जिल्ह्यातील वणी या ठिकाणी बिलोली पोलिसांच्या सूचनेवरून मुख्य आरोपी मोहम्मद हमीद अफजल अहमद यास ताब्यात घेऊन बिलोली येथील कनिष्ठस्तर न्यायालयासमोर हजर केले असता न्यायाधीश  राजेश पत्की यांनी मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

जिल्ह्यातील अनेकांना गंडा 


सुशिक्षित बेरोजगारांना लुबाडणाऱ्या या आरोपीच्या विरोधात तेलंगणातील निजामाबाद, आरमूर, बांसवाडा कामारेडी यासह मराठवाड्यातील बिलोली, देगलूर, नायगाव, मुखेड, उमरी, धर्माबाद, उस्मानाबाद, नांदेड आदी ठिकाणी ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. आरोपी ताब्यात येताच बिलोली पोलिसांनी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर धुमाळ व पोलिस निरीक्षक भगवान धबडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास कार्य सुरू केले आहे. मुख्य आरोपी अटक होताच ज्यांची फसवणूक झाली असे अनेक तरुण बिलोली पोलिस ठाण्यात दाखल होत आहे. त्यामुळे या प्रकरणाशी निगडित असलेले अनेक मध्यस्थींचे धाबे दणाणले आहे.

फसगत झालेल्यांनी पुढे यावे.

बिलोली तालुक्यातील अनेक प्रतिष्ठित कर्मचारी या प्रकरणात गुंतलेले असल्याची चर्चा असून संशयाची सुई फिरत आहे. बिलोलीसह परिसरातील ज्या तरुणांची यापूर्वी फसवणूक झाली असेल त्यांनी आपली तक्रार पोलिस ठाण्यात नोंदवावी असे आवाहन पोलिस निरीक्षक भगवान धबडगे यांनी केले आहे.
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()