हिंगोली : हिंगोली नगरपरिषदेच्या वतीने शहरातून गोळा करण्यात आलेल्या कचऱ्यातील प्लास्टिकपासून पॅलेट्स निर्मिती करीत ते कारखान्यांना विक्री करण्यात येणार आहे. कचऱ्यातून उपलब्ध होणाऱ्या कापडापासून दोरी निर्मितीचा प्रकल्प लवकरच घनकचरा व्यवस्थापन केंद्रांमध्ये कार्यरत होणार असल्याची माहिती हिंगोली (Hingoli) नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डाॅ.अजय कुरवाडे यांनी दिली. शहरातील एमआयडीसी परिसरात असलेल्या नगरपरिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन केंद्रामध्ये यापूर्वी कचरा वर्गीकरण यंत्र बसविण्यात आले आहे. या यंत्राद्वारे कचऱ्याचे वर्गीकरण होत असून खत देखील उपलब्ध होत आहे. (In Hingoli Palates Makes From Garbage Plastic)
हे खत अतिशय उच्च प्रतीचे असल्यामुळे त्याला मागणी देखील वाढत आहे. नगरपरिषदेच्या वतीने खत विक्री देखील केले जात आहे. या कचरा व्यवस्थापनामधून (Garbage Management) जो काही प्लास्टिक प्रकार उपलब्ध होत आहे. तो यापूर्वी गठ्ठे स्वरूपात बांधून कारखान्यांना विकल्या जात असे परंतु आता या प्लास्टिकवर थेट घनकचरा व्यवस्थापन केंद्रांमध्ये प्रक्रिया करण्यात येणार आहे. याद्वारे प्लास्टिक पॅलेट्स तयार करण्यात येणार आहेत. या पेलेट्स विविध कारखान्यांमध्ये बॉयलर करिता उपयोगी पडत असतात. त्यामुळे थेट पॅलेट्स विक्री केल्यानंतर याचा नगरपरिषदेला अधिक फायदा होणार आहे.
या व्यतिरिक्त कचऱ्यामधून जे कापड उपलब्ध होत आहे, त्या कापडावर प्रक्रिया करण्यासाठी दोरी निर्मिती केंद्र लवकरच सुरू करण्यात येणार आहे. टाकाऊपासून टिकाऊ उद्देशाने निर्माण होणाऱ्या दोऱ्या स्वस्त दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामुळे देखील पालिकेच्या उत्पन्नात भर पडणार आहे. तसेच घनकचरा व्यवस्थापन केंद्र परिसरात अटल घनवट प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यापूर्वी पालिकेच्या वतीने या परिसरात सहाशे वृक्षांची लागवड करण्यात आली असून त्यांचे योग्य संगोपन देखील केल्या जात आहे. या पाठोपाठ आता अटल धनवन प्रकल्प वरून परिसराचा कायापालट केल्या जाणार आहे, अशी माहिती पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. कुरुवाडे यांनी दिली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.