Latur Crime : गर्भपात करताना बोगस डॉक्टराला रंगेहात पकडले; वैद्यकीय अधिकारी व पोलिस पथकाची कामगिरी

यावेळी गर्भपात करणारा डॉ इरफान शमशोद्दीन मोमीन रा.बाबा नगर निडेबन याची चौकशी केली असता त्याच्याकडे कसलेही वैद्यकीय शिक्षणाचे प्रमाणपत्र नसल्याचे निष्पन्न झाले.
abortion
abortionesakal
Updated on

उदगीर, (जि.लातुर) : उदगीर परिसरात अवैध गर्भपात होत असल्याच्या घटना घडत असल्याची चर्चा चालू होती.या पार्श्वभूमीवर येथील सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी, शहर व ग्रामीण पोलिस अधिकारी पाळत ठेवून येथील बनशेळकी रोडवर असलेल्या एका बोगस डॉक्टरांच्या दवाखान्यात एका पिडीत महिलेचा गर्भपात करत असताना रंगेहात पकडून त्यास ताब्यात घेण्यात आल्याची घटना घडली आहे.

याबाबत ग्रामीण पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांनी दिलेली अधिक माहिती अशी की रविवारी (ता.२२) रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ पांडुरंग दोडके, डॉ आरती वाडीकर, शहर पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे,

ग्रामीण पोलीस निरीक्षक श्री पुजारी यांच्या टीमने अवैध गर्भपात होत असल्याची माहिती मिळाल्यावर बनशेळकी रोड येथील चाचा हॉटेल शेजारी असलेल्या आपल्या क्लिनिक या दवाखान्यात छापा टाकला असता एका पिडीत महीलेच्या चार महीन्याच्या गर्भपाताची प्रक्रिया करत असताना मिळून आले.

यावेळी गर्भपात करणारा डॉ इरफान शमशोद्दीन मोमीन रा.बाबा नगर निडेबन याची चौकशी केली असता त्याच्याकडे कसलेही वैद्यकीय शिक्षणाचे प्रमाणपत्र नसल्याचे निष्पन्न झाले. सदरील पीडीत महिलेस पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळावरून रक्ताचा स्त्राव, गर्भपात गोळ्या, औषधी, इंजेक्शन, सलाईन आधी ताब्यात घेऊन जप्त करण्यात आले आहे.

याप्रकरणी सदर बोगस डॉक्टर मोमीन व त्यास गर्भपातासाठी रुग्ण पुरविणाऱ्या धन्वंतरी आयुर्वेद मेडिकल रुग्णालयात काम करणाऱ्या फरजाना पठाण रा.मुसा नगर यांना ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गर्भपात प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया ग्रामीण पोलीस ठाण्यात सुरू आहे याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक परशुराम देवकते करीत आहेत.

गर्भलिंग निदान रॅकेट पुन्हा कार्यरत?

उदगीर शहर व परिसरात गर्भलीन चाचण्या व अवैध गर्भपात करण्याचे रॅकेट पुन्हा सक्रिय झाले असल्याचे यावरून दिसून येते. या पिढीत महिलेला अगोदरची एक मुलगी आहे. चार महिन्याची गरोदर असताना नेमका गर्भपात कोणी करायला लावला?

याचा तपास पोलीस करत आहेत. या महिलेने गर्भलिंग निदान चाचणी उदगीर शहरात केली होती की शेजारील कर्नाटक राज्यात केली होती? याबाबतचा कसून तपास करण्यात येणार असून यात जेजे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे ग्रामीण पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.