Latur : नवे शैक्षणिक धोरण विज्ञान नाकारणारे ; प्रा. ऋषिकेश कांबळे,नवव्या राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाचे उद्‍घाटन

कौशल्य विकासाच्या नावाखाली विज्ञानाला नाकारणारे नवे शैक्षणिक धोरण आहे. यामुळे समाजात विषमता निर्माण होणार आहे. त्यामुळे याला विरोध करून ते थोपविण्याची जबाबदारी समाजाची आहे.
latur
latur sakal
Updated on

लातूर : कौशल्य विकासाच्या नावाखाली विज्ञानाला नाकारणारे नवे शैक्षणिक धोरण आहे. यामुळे समाजात विषमता निर्माण होणार आहे. त्यामुळे याला विरोध करून ते थोपविण्याची जबाबदारी समाजाची आहे. त्यादृष्टीने प्रयत्न झाले पाहिजेत, असे मत ज्येष्ठ साहित्यिक प्रा. ऋषिकेश कांबळे यांनी येथे व्यक्त केले.

महाराष्ट्र प्रदेश शिक्षक प्रतिनिधी सभेतर्फे मंगळवारी नवव्या राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाचे उद्‍घाटन झाले. यावेळी संमेलनाध्यक्ष कांबळे यांनी आपली भूमिका मांडली. याप्रसंगी लातूर जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी नागेश मापारी, ज्येष्ठ साहित्यिक फ. म. शहाजिंदे, ज्येष्ठ कवी योगीराज माने, महाराष्ट्र विकास आघाडीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बसवंत उबाळे, प्रा. गोविंद घार, प्रभाकर कापसे, प्रा. यू. डी. गायकवाड, ब्रिजलाल कदम, संजय आलमले यांची उपस्थिती होती.

latur
Latur : नळेगाव येथे कडकडीत बंद ; वलांडी येथे चिमुकलीवर अत्याचाराच्या घटनेचा निषेध

‘राज्यात विनाअनुदानित तत्वामुळे शिक्षण क्षेत्राचे नुकसान झाले. संस्थाचालक अडचणीत येऊन गरीब विद्यार्थ्यांचे शिक्षणही धोक्यात आले. नव्याने अमलात येणारे केंद्र शासनाचे शैक्षणिक धोरण अन्यायकारक आहे. त्यामुळे सामान्य विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहतील, असा आरोप कांबळे यांनी केला. प्रास्ताविक मुख्य संयोजक कालिदास माने, सूत्रसंचालन विवेक सौताडेकर तर आभार अभंग बिराजदार यांनी मानले.

ग्रंथदिंडीने वेधले लक्ष

संमेलनानिमित्त काढलेल्या ग्रंथदिंडीने लातूरकरांचे लक्ष वेधून घेतले. दिंडीत शहरातील विविध शाळांतील विद्यार्थी सहभागी झाले होते. विविध वेशभूषेतील विद्यार्थी व स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून ७५ मीटर लांबीचा राष्ट्रध्वजही दिंडीत सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.