Inspiring Story : गणेश जोगदंड बनला सांख्यिकी सहाय्यक

अनाळ्याच्या गणेशने केले मोलमजुरी करणाऱ्या आईच्या कष्टांचे चीज
inspiring story of ganesh jogdand crack ibps exam statistical assistant
inspiring story of ganesh jogdand crack ibps exam statistical assistantSakal
Updated on

अनाळा : परंडा तालुक्याच्या अनाळा येथील गणेश नवनाथ जोगदंड याने आयबीपीएस अंतर्गत घेण्यात आलेल्या परिक्षेत यश मिळवले आहे. गणेशची सांख्यिकी सहाय्यक पदी निवड झाली आहे. गणेश याने प्रतिकुल आर्थिक परिस्थितीवर मात करत हे यश मिळवले आहे.

बालवयातच गणेशच्या वडिलांचे अल्पशा आजाराने निधन झाले. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची, वडिलाचे छत्र हरवल्याने गणेशच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी त्याची आई हिराबाई यांनी मोलमजुरी करून गणेशला शिकविले.

गणेश यानेही आईच्या कष्टाची जाणीव ठेवून अभ्यासात सातत्य ठेवत हे यश प्राप्त केले. गणेशचे प्राथमिक शिक्षण अनाळा येथील न्यू हायस्कूल शाळेत, उच्च माध्यमिक शिक्षण बार्शी येथील महाराष्ट्र विद्यालयात तर पदवी शिक्षण शिवाजी महाविद्यालयात झाले आहे.

घरची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. त्यामुळे गणेशच्या शिक्षणासाठी पैसे कोठून आणायचे या चिंतेने मी ग्रासले होते. परंतु मी मोलमजूरी करून पैसे जमा केले. गणेशच्या या यशामुळे मी केलेल्या कष्टाचे चीज झाले.

- हिराबाई जोगदंड, आई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.